पुणे! अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने कॅफेमध्ये केला लैंगिक अत्याचार अन्…

पुणे : एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची आणि त्यानंतर तिचे आक्षेपार्ह (न्यूड) फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना तळेगाव दाभाडे परिसरातून उघडकीस आली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन विधीसंघर्षित बालकांसह (अल्पवयीन मुले) कॅफे मालकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

पीडित १२ वर्षीय मुलगी तिच्या आईसोबत तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. तिच्या काही मित्रांनी तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची प्राथमिक तक्रार तिने नोंदवली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जेव्हा पीडित मुलीकडे सखोल चौकशी केली, तेव्हा या प्रकरणातील धक्कादायक वास्तव समोर आले. काही दिवसांपूर्वी तिच्याच एका ओळखीच्या मुलाने तिला तळेगावमधील ‘कोजी कॅफे’ (Cozy Cafe) येथे नेले होते. या कॅफेमध्ये त्या मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. धक्कादायक म्हणजे, या कॅफेमध्ये अशा प्रकारचे अनैतिक आणि बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याची माहिती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 165 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

तळेगाव दाभाडे पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली. ‘कोजी कॅफे’च्या मालकाला पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केली आहे. तसेच पीडित मुलीवर अत्याचार करणाऱ्या आणि तिचे फोटो व्हायरल करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबतची माहिती देताना तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले की, “बारा वर्षांच्या पीडित बालिकेच्या तक्रारीवरून दोन विधीसंघर्षित बालकांसह कॅफे मालकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. संबंधित कॅफेमध्ये असे प्रकार चालत असल्याचे चौकशीत समोर आले असून, त्या अनुषंगाने कॅफे मालक शिंदे याच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.”

नात्याला काळीमा! चुलतभाऊ अन् आजोबांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

पुणे शहरात अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाने केला अत्याचाराचा प्रयत्न…

बीड पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलीवर चुलत्याने केला अत्याचार; मुलीचा मृत्यू…

पुणे! प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती अन् ससूनमध्ये…

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे तब्बल २०० हून अधिक नराधमांनी तोडले लचके…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!