हिट ॲण्ड रन! पुणे शहरात कारने पोलिकाकाला चिरडले…

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावरील बोपोडी परिसरात अज्ञात वाहनाने रविवारी (ता. ७) मध्यरात्री दुचाकीवरील पोलिस मार्शलला उडवले आहे. त्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला तर दुसऱ्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला असून, त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

खडकी पोलिस स्टेशनचे खडकी बाजार मार्शलवरील कर्मचारी संजोग शिंदे आणि पोलिस हवलदार कोळी यांच्या दुचाकीला रात्री दीड वाजता अज्ञात इनोव्हा गाडीने बोपोडी चौक येथे जोरदार धडक दिली. अपघातानंतर चालकानं गाडीसह घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमध्ये पोलिस हवालदार कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॅरिस ब्रीजच्या खाली रात्री पावनेदोनच्या सुमारास हा अपघात घडला आहे. खडकी पोलिस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलिस कॉन्स्टेबल रात्रीची गस्त घालण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असताना समोरून वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला आहे. चालकाचा शोध सुरू आहे. पोलिस हवालदार कोळी यांच्या मृत्युमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…

भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; आमदार म्हणतात…

पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीने लिहिलेला निबंध आला समोर…

नागपूरमध्ये भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडलं…

नशिब बलवत्तर! पिंपरी-चिंचवडमध्ये अपघाताचा धक्कादायक Video समोर…

क्लास वन अधिकारी अन् सासऱ्याची सुपारी; कसा उलगडा झाला पाहा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!