पोलिसकाका Video News: २७ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…
‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या
छत्रपती संभाजीनगर : आंतरजातीय विवाह केल्यामुळे मुलीच्या वडिलांनी आणि भावाने मिळून युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमित साळुंखे असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. विद्या आणि अमित दोघेही बालपणीचे मित्र होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. दोघांनी पळून जाऊन पुण्यात विधिवत लग्न केले होते. अमितच्या घरच्यांचा पाठिंबा मिळाल्याने ते परत आल्यानंतर हत्येची घटना घडली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
लातूरमध्ये भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
लातूरः लातूरच्या औसा तालुक्यात टाटा नेक्सनचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातात दिनेश दंडगुले आणि सचिन माने कुसळकर या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अमेरिकन महिलेला फसवणाऱ्या बुकीला दिल्लीतून अटक
नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीतून एक मोठा बुकी आणि क्रिप्टोकरन्सी हँडलरला अटक केली आहे. लक्ष्य विज असे या आरोपीचे नाव आहे. त्याने एका अमेरिकन महिलेची चार लाख अमेरिकन डॉलर्सची फसवणूक केली आहे. यापूर्वीही गुजरात पोलिसांनी त्याला अटक केली होती.
नाशिकमध्ये रॉयल मिरवणूक काढणे आरोपीला भोवलं
नाशिकः नाशिकमधील सराईत गुंड जेलमधून सुटताच त्याची शरणपूर रोड परिसरात जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी हर्षद पाटणकर या गुंडावर कारवाई केली आहे. त्याची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी केली आहे.
लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या महिलेची फसवणूक
नाशिक: लष्करातून सेवानिवृत्त झालेल्या वृध्द महिलेची शेजारच्यांनीच तब्बल सव्वा कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आजारपणात असाह्यतेचा लाभ उठवत शेजारी राहणा-यांनी धनादेश चोरून ही फसवणुक केली असून, याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमएसईबी मधून बोलत असल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेची फसवणूक
पुणे : एमएसईबी मधून बोलत असल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेच्या मोबाईलचा अॅक्सेस घेऊन सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातील ११ लाख ८१ हजार ९९२ रुपये काढून घेऊन फसवणूक केली आहे. प्रभात रोडवर राहणार्या एका ७६ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाघोलीत ज्वेलर्सचे दुकान फोडणाऱ्या दोघांना अटक
पुणे: वाघोली येथील गणेश ज्वेलर्सचे दुकान फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारांना चोरीच्या वाहनांसह जेरबंद करून गुन्हे शाखा युनिट ६ ने एकूण ५ गुन्हे उघड केले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांनी केली एकाची हत्या
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात जयराम कोमटी गावडे (वय 38) यांची माओवाद्यांनी हत्या केली आहे. हत्येनंतर मृतदेह मुख्यरस्त्यावर आणून ठेवला होता. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शेतकर्यांना बोगस डीएपी खतांची विक्री
अमरावतीः शेतकर्यांना बोगस डीएपी खतांची विक्री करणाऱ्या आणि मिश्र खतांच्या नावाखाली माती विकणात आल्याच्या धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये घडकीस आला आहे. पुणे येथील रामा फर्टिकेम कंपनीच्या विकास नलावडे विरुद्ध अमरावती शहर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजोबांच्या हत्येची नातीनेच दिली सुपारी
लखनौ (उत्तर प्रदेश): रेल्वेचे निवृत्त झालेल्या वृद्धाची संपत्तीच्या लालसेपोटी हत्या करण्यात आली आहे. नातीनेच हत्येची सुपारी दिली होती. शिवाय, हत्येचे एक दिवस आधीच विमानाने पुण्याला पोहचली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा करत मास्टरमाईंड नातीसह ३ जणांना अटक केली आहे.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…