Video News: पोलिसकाका Top 10 बातम्या…

नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…

‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

आएएस पूजा खेडकर यांच्या आईने हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना धमकावले
पुणेः वादग्रस्त IAS अधिकारी पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या हातामध्ये पिस्तुल घेऊन मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला धमकावत असल्याचे दिसत आहे.

नाशिक हिट अँड रन प्रकरणी गुजरातमधून दोघांना बेड्या
नाशिक : चांदवड परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिट अँड रन प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधून दोन आरोपींना अटक केली आहे. मोठं रॅकेट यात सक्रिय असण्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकणात दोन चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

भाजपच्या मंत्र्याला शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी अभिनेता अटकेत
पणजी: गोव्यातील भाजपमधील मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अभिनेता गौरव बक्षी याला अटक केली आहे. मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना धमकी देऊन त्यांच्या सेवेत असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप गौरव बक्षीवर आहे.

नेपाळमध्ये प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत कोसळल्या
काठमांडू (नेपाळ) : नेपाळमध्ये दरड कोसळली आणि प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत कोसळल्या आहेत. दोन बसमध्ये प्रवास करणारे 63 जण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये भारतीय नागरिकांचा समावेश आहे.

हुतात्मा जवानाच्या वडिलांचे आरोप; सून सगळं घेऊन गेली
नवी दिल्ली : हुतात्मा कॅप्टन अंशुमन यांना मरणोत्तर कीर्ति पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर त्यांची पत्नी स्मृती सिंह यांच्यावर अंशुमन यांच्या आई-वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. हुतात्मा मुलाला मिळालेले कीर्ति चक्र घेऊन सून माहेरी गेली, आमच्याकडे काहीच ठेवले नाही, असे आरोप अंशुमन यांच्या वडिलांनी केले आहेत.

अकोल्यात प्रेम प्रकरणातून पोलिसावर हल्ला
अकोला : एका प्रेम प्रकरणातून चक्क पोलिसावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आईसह 2 भावांविरोधात चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 2 भावांना ताब्यात घेतले आहे.

वाशिम जिल्ह्यात विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू
वाशिम: वाशिम जिल्ह्यात शेतात फवारणीदरम्यान विजेचा धक्का लागून वडील, मुलगा आणि त्याच्या चुलत भावाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अरुणाचल प्रदेशातील प्रसिद्ध यूट्यूबर युवतीचा मृत्यू
इटानगरः अरुणाचल प्रदेशातील प्रसिद्ध ब्लॉगर रूपची टाकू हिचा चौथ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स होते. तिच्या मृत्यूने तिच्या फॉलोअर्सलाही मोठा धक्का बसला आहे.

जळगावमध्ये चोरट्यांनी १२ कुत्र्यांना केलं ठार
जळगावः जळगावमध्ये चोरट्यांनी चोरी करताना अडथळा ठरू नये म्हणून १२ कुत्र्यांना एकाचवेळी ब्रेड्मध्ये विषारी औषध टाकून ठार मारल्याची सतांपजनक घटना घडली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून चंदनाच्या झाडांची चोरी
पुणेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामधील पाच चंदनाची झाडे चोरट्यांनी कापून नेली आहेत. चतुश्रृंगी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!