
पोलिस दलात खळबळ; अनैसर्गिक संबंधासाठी युवकावर तगादा…
हिंगोली: कळमनुरी तालुक्यात एका युवकाला (वय २४) अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावण्याच्या त्रासाला त्याने गळफास घेतला आहे. नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाच्या त्रासाला कंटाळून युवकाने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या धक्कादायक घटनेने पोलिस विभागासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या युवकाची नांदेड येथील पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक सातपुते याच्यासोबत मैत्री झाली होती. युवकाला अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी लिपिक अभिषेक सातपुते याने तगादा लावला होता. मात्र सततच्या त्रासाला कंटाळून युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत बँकेच्या कर्ज वसुलीसाठी आलेल्या महिलेकडे (वय २५) एका डॉक्टरकडून शरिर सुखाची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार टेभुर्णीत समोर आला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार डॉक्टर विरोधात टेंभुर्णी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित महिला बँकेच्या कर्ज वसुलीसाठी या डॉक्टरकडे आली होती. यावेळी डॉक्टरने शरीर सुखाची मागणी केल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे.
पुणे! वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून महिला सेक्रेटरीची हत्या…
अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या मोबाईलमध्ये आढळले Video; सहा अटकेत…
हृदयद्रावक! लग्नाच्या पत्रिकेवर ज्याचं नाव त्याच मुलावर अंत्यसंस्काराची वेळ…
मुलगा तुझ्या सारखा दिसत नाही म्हणून टोमणे अन् बापाने घेतला चिमुकल्याचा जीव…
प्रेमविवाहानंतर पत्नी निघून गेली अन् भाऊ पोहचेपर्यंत सगळं संपलं होतं…

