पुणे शहरात मध्यरात्री भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू…

पुणे: पुणे शहराच्या वारजे माळवाडी परिसरातील गोकुळनगर येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना पत्र्याच्या बांधकाम असलेल्या घरांमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे घडली.

वारजे माळवाडी भागातील गोकुळ नगरमध्ये असलेल्या काही पत्र्याच्या घरांना मध्यरात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. एका घरात सिलिंडरचा मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले. मध्यरात्रीची वेळ असल्याने अनेकजण गाढ झोपेत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. मात्र, आगीच्या भीषणतेमुळे आणि पत्र्याचे बांधकाम असल्यामुळे आग वेगाने पसरली. या दुर्घटनेत दोन व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी असून, आगीच्या कारणांचा आणि मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुणे! चहाच्या टपरीवर सिलिंडरचा स्फोट; अनाथ संतोष पहिल्याच दिवशी होरपळून मृत्यू…

रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू…

प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेलेला प्रियकराचा होरपळून मृत्यू…

गुजरातमध्ये गेम झोनमध्ये भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!