
प्रियकर आणि प्रेयसीने ठरवून कालव्यात मारली उडी; पण खरा ट्विस्ट तर पुढे…
जालना: प्रियकर आणि प्रेयसीने शेवटचं एकमेकांना डोळे भरून पाहिलं, आणाभाका घेतला आणि दोघांनीही सोबतच कालव्यात उडी मारली. पण, प्रियकराने धोका दिला. प्रियकर हळूच पाण्यातून बाहेर आला आणि प्रेयसीला संपवले. पोलिसांनी प्रियकराला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
प्रियकराने आपल्या प्रेयसीला मृत्यूच्या दारात ढकलल्याची खळबळजनक घटना अंबड तालुक्यातील नालेवाडी शिवारात घडली. याप्रकरणी गोंदी पोलिसांनी आरोपी प्रियकराला मध्यरात्री बेड्या ठोकल्या आहेत. बाबासाहेब छगन राठोड असे आरोपीचे तर सुरेखा आन्वीकर असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
प्रियकर आणि प्रेयसी दोघेही विवाहित होते. दोघांची कामाच्या ठिकाणी ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघंही ठरल्या प्रमाणे भेटले. पण प्रियकर म्हणाला आपण पळून जाऊनही आपल्याला कुणीही स्वीकारणार नाही. त्यापेक्षा आपण दोघंही एकत्र जाऊया. कायमचं जाऊ, कुणाला आपला त्रास नाही, आपण एकमेकांशिवाय राहू शकत नाही. शेवटचं एकमेकांना डोळे भरून पाहिलं, आणाभाका घेतला आणि दोघांनीही कालव्यात एकत्र उडी मारली. दोघांनी कालव्यात उडी घेतल्यानंतर पुढच्या काही मिनिटांत प्रियकर हळूच पाण्यातून बाहेर आला. महिलेचा मात्र बुडून मृत्यू झाला. प्रियकराने आयुष्य संपवण्याचा खोटा बनाव रचला आणि प्रियसीलाच संपवले.
सुरेखा विवाहित होती, पण पतीसोबत वाद झाल्याने ती घर सोडून बाबासाहेबसोबत राहण्यासाठी आली होती. मात्र, बाबासाहेब स्वतः विवाहित असल्याने त्याला तिला कायमचं सोबत ठेवणं शक्य नव्हते. सुरेखा वारंवार एकत्र राहण्याचा तगादा लावत असल्याने बाबासाहेबने तिचा काटा काढण्याचा थरारक कट रचला. रात्रीच्या सुमारास बाबासाहेबने सुरेखाला नालेवाडी शिवारातील डाव्या कालव्यापाशी बोलवले. तिथे तिला इमोशनल ब्लॅकमेल केले आणि आपल्या जाळ्यात ओढले. “दोघे सोबत आत्महत्या करू” असं सांगून त्याने सुरेखाला कालव्यात ढकलले आणि स्वतःही उडी घेतली. मात्र, बाबासाहेबला पोहता येत असल्याने तो सुखरूप बाहेर आला, पण पोहता येत नसल्याने सुरेखाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
प्रेयसीचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह अर्धा पाण्याबाहेर ओढून काढला आणि तो स्वतःच गोंदी पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी सखोल तपास केल्यावर हा एक नियोजित खून असल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी बाबासाहेब राठोडला अटक केली असून पुढील तपास करत आहेत.
प्रेयसीचा लग्नास नकार दिल्याने प्रियकराने घेतला जगाचा निरोप; मृतदेहाजवळ फोटो…
पंढरपूरमध्ये प्रियकराने रिलस्टारला वाढदिवसाच्या दिवशीच संपवलं…
नवऱ्याला म्हणाली, तू मला खुश ठेवू शकत नाहीस अन् प्रियकराला…
पुणे! प्रियकर पतीला मारत असताना पत्नीने मोबाईल सुरू केला अन्…
पुणे! वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून महिला सेक्रेटरीची हत्या…

