
पुणे शहरातील प्रसिद्ध भिडे पुलाजवळ आढळला युवकाचा मृतदेह…
पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या प्रसिद्ध भिडे पुलाजवळ एक मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
भिडे पुलाजवळीव नदीपात्राच्या परिसरात एका अज्ञात युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, युवकाची दगडाने ठेचून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा घातपाताचा प्रकार असल्याचे स्पष्ट होत असून, हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरपणे हा गुन्हा केल्याचे दिसून येत आहे. पुणे पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी परिसरातील पंचनामा सुरू केला असून फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून, पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारची घटना समोर आली होती. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्लेखोरांचा माग काढण्याचे काम सध्या सुरू आहे. पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
पुणे! वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून महिला सेक्रेटरीची हत्या…
पुणे! युवकाच्या ब्लॅकमेलिंगमुळे युवतीने केली आत्महत्या…
पुणे हादरलं! लघुशंकेसाठी थांबलेल्या युवकाची ठेचून हत्या…
पुणे शहरात युवकाची धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या…
पुणे हादरलं! शरीरसंबंधांना नकार देताच महिलेची हत्या…

