पुणे! वकील नवऱ्यासोबत अनैतिक संबंधाच्या संशय; धक्कादायक माहिती समोर…

पुणे: पुण्यातील भाजपचा विधी शाखेचा अध्यक्ष एडव्होकेट संजय सावंत याला अनैतिक संबंधाच्या संशयातून सेक्रेटरी पुनम दिनेश मून यांचा खून केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. संजय सावंतसोबत त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीलाही खूनात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संजय सावंत याची पत्नी स्वाती सावंत ही मुलीसह कार्यालयात आली होती. पुनम मून यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून स्वाती सावंत हिने पूनम मून यांच्याशी वाद सुरू केला. यानंतर वाद इतका वाढला की स्वातीने पुनमच्या डोळ्यावर प्रथम झुरळ मारणारे औषध मारले. त्यानंतर पूनमला लाकडी बॅटने मारत गंभीर जखमी केले. कार्यालयातील कोयत्याने पूनमच्या तोंडावर 56 पेक्षा जास्त वार करुन संपवल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पुनम यांना संपवल्यानंतर मृतदेह पोत्यात भरुन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र वजनामुळे शक्य झाले नाही. त्यामुळे स्वाती पुनमचा मृतदेह कार्यालयातच सोडून निघून गेले.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पुनम मून या एडव्होकेट संजय सावंत याच्या मुंढवा भागातील कार्यालयात सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या. मात्र त्यांचे संजय सावंत याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय संजय सावंतची पत्नी स्वाती सावंतला होता. त्यातून पूनम मून हिच्यासोबत त्यांचे वाद होत होते. 16 एप्रिलला एडव्होकेट संजय सावंतच्या कार्यालयात संजय सावंत, त्याची पत्नी स्वाती आणि अल्पवयीन मुलीने पुनम मून यांना मारहाण सुरू केली. त्यानंतर पुनम यांचे पाय दोरीने बांधून त्यांना बॅटने मारहाण करण्यात आली. त्यामध्ये पुनम मून यांचा मृत्यू झाला.

पुनम मून यांचा मृतदेह पोत्यात भरुन ते पोतं ऑफिसमध्येच लपवून ठेवण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या सावंत यांचा विचार होता. पुनम मुन यांचे पती उद्धव मुन यांनी त्यांची पत्नी घरी न आल्याने शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते एडव्होकेट संजय सावंतच्या कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालयात ऐक पोतं आढळून आले. ते पोतं त्यांनी उघडून पाहिलं असता आतमध्ये पुनम मून यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला अटक केली आहे.

पुणे! वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून महिला सेक्रेटरीची हत्या…

पुणे शहरातील प्रसिद्ध भिडे पुलाजवळ आढळला युवकाचा मृतदेह…

प्रियकर आणि प्रेयसीने ठरवून कालव्यात मारली उडी; पण खरा ट्विस्ट तर पुढे…

पोलिस दलात खळबळ; अनैसर्गिक संबंधासाठी युवकावर तगादा…

प्रेयसीचा लग्नास नकार दिल्याने प्रियकराने घेतला जगाचा निरोप; मृतदेहाजवळ फोटो…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!