
नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी समोर…
नाशिक: नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरणाचे प्रकरणाची हादरवणारी कहाणी समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतः लक्ष घातले आहे. हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेत कशाप्रकारे महिलांना मानसिक आणि शारीरिक जाचाला सामोरे जावे लागले, याचे विदारक चित्र आता समोर आले आहे.
तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील एका पीडित युवतीने केवळ आपल्या कॅन्सरग्रस्त वडिलांच्या उपचारासाठी अत्याचार सहन केला आहे. वडिलांची किमोथेरपी आणि औषधांच्या पैशांची गरज असल्याने, तिने वरिष्ठांकडून होणारा मानसिक छळ आणि अपमान निमूटपणे सोसला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे “नोकरी टिकवणे” ही तिची अपरिहार्यता होती, ज्याचा फायदा नराधमांनी घेतला आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
दुसऱ्या पीडितेने राष्ट्रीय महिला आयोगासमोर धक्कादायक माहिती दिली. कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असताना, तिला नोकरीच्या बदल्यात धर्मांतर करण्याच्या छुप्या अजेंड्याला बळी पाडण्यात आले. “वडिल आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेले आहेत आणि घरची भूक मिटवण्यासाठी मला हे सर्व सहन करावे लागले,” अशी कैफियत पीडितेने मांडली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने काल TCS कंपनीला प्रत्यक्ष भेट दिली. सुमारे एक तास चाललेल्या या पाहणीत पथकाने खालील बाबींची तपासणी केली. पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, कामाचे विविध विभाग आणि सुरक्षितता, कॅन्टीन आणि वेटिंग रूममधील सीसीटीव्ही फुटेज व व्यवस्थेची तपासणी करण्यात आली. महिला आयोगाने काही पीडित युवतींशी संवाद साधला आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी आयोगाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे.
नाशिक! TCS HR निदा खान हिने जामीन अर्जात दिली धक्कादायक माहिती…
नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरण! आयटी कंपनी TCS कडून मोठा निर्णय…
नाशिक! महिला पोलिस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् केला भांडाफोड…
अशोक खरात प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर…
नाशिक! बड्या IT कंपनीत नोकरी द्यायचे, मग रिसॉर्टवर नेऊन करायचे अत्याचार…
नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

