नाशिक! TCS कंपनीतील निदा खान हिच्या जामीन अर्जावर सुनावणीपूर्वीच धक्कादायक माहिती समोर…

नाशिक : TCS कंपनीतील कथित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रयत्नप्रकरणी संशयित असलेली निदा खान ८ एप्रिलपासून एसआयटीच्या रडारवर आहे. तपासादरम्यान ती ११ एप्रिल रोजी मुंब्रा येथे एका प्रसुतीतज्ज्ञ डॉक्टरकडे उपचारासाठी गेल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यानंतर ती पुन्हा पसार झाली आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, निदा खान सुमारे दहा दिवसांपूर्वी मुंब्र्यातील एका दवाखान्यात गेली होती. त्यानंतर ११ एप्रिल रोजी ती पुन्हा त्याच ठिकाणी मास्क लावून आली. यावेळी तिने संबंधित डॉक्टरकडून ‘बेड रेस्ट’चे वैद्यकीय प्रमाणपत्र घेतल्याची माहिती समोर आली आहे. निदा खानने हेच वैद्यकीय प्रमाणपत्र नाशिकरोड न्यायालयात सादर करत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज (सोमवार) सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या एसआयटी पथकाकडून निदा खान हिचा शोध सुरू आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाच्या चार सदस्यीय समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू ठेवली आहे. समितीने पीडित युवती आणि तिच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच पीडितेला वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि कायदेशीर सहाय्य मिळाले आहे का, याचीही पडताळणी करण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने संबंधित यंत्रणांना नोटीस बजावली आहे. ‘लीगल राइट्स ऑब्झर्व्हेटरी’च्या तक्रारीनंतर राज्याचे पोलिस महासंचालक, कामगार आयुक्त आणि संबंधित कंपनी व्यवस्थापनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी समोर…

नाशिक! TCS HR निदा खान हिने जामीन अर्जात दिली धक्कादायक माहिती…

नाशिकमधील लैंगिक अत्याचार प्रकरण! आयटी कंपनी TCS कडून मोठा निर्णय…

नाशिक! महिला पोलिस आयटी कर्मचाऱ्यांच्या वेशात गेल्या अन् केला भांडाफोड…

अशोक खरात प्रकरणातील आणखी एक धक्कादायक माहिती समोर…

नाशिक! बड्या IT कंपनीत नोकरी द्यायचे, मग रिसॉर्टवर नेऊन करायचे अत्याचार…

नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!