
बाबा सिद्दिकी! API राजेंद्र दाभाडे यांनी जीवाची बाजी लावून पकडले आरोपी…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी (ता. १२) गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना API राजेंद्र दाभाडे या पोलिस अधिकाऱ्याने जीवाची बाजी लावून पकडले आहे. राजेंद्र दाभाडे हे मुंबईतील निर्मल नगर ठाण्यामध्ये एपीआय म्हणून नियुक्तीस आहेत.
बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी राजेंद्र दाभाडे हे त्या ठिकाणी देवी विसर्जनासाठी बंदोबस्तासाठी तैनात होते. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार होताना पाहिल्यानंतर एपीआय राजेंद्र दाभाडे यांनी आरोपीच्या हातात बंदूक असताना देखील मोठे धाडस दाखवत आणि जीवावर उदार होऊन दोन आरोपींना पकडले. यातील एक आरोपी हा गर्दी आणि फटाक्यांच्या धुराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला.
फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडून 15 टीम तयार करण्यात आल्या आहेत. राजेंद्र दाभाडे या पोलिस अधिकाऱ्याने दाखविलेल्या धैर्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 28 जिवंत काडतूसं, दोन मोबाईल जप्त केले आहेत. यातील एक मोबाइल हा फक्त कॉलिंगसाठी होता. तर दुसरा नियमीत वापरासाठी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातला फरार आरोपी शिवानंद हा पनवेलमधून बाहेरच्या राज्यात पळून गेल्याचे समोर आले आहे. शिवानंद हा पनवेल स्टेशनवरच्या सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली. आरोपी शिवानंदच्या शोधासाठी पोलिसांची पथकं मध्य प्रदेशातील उज्जैन, हरियाणा, यूपी आणि दिल्लीकडे रवाना झाली आहेत.
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांची हत्या लॉरेन्स बिष्णोई गँगने केली का? याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. बाबा सिद्दिकींना वाय दर्जाची सुरक्षा नव्हती, त्यांना नेहमीची सुरक्षा असून त्यांच्या सुरक्षेत तीन पोलिस कॉन्स्टेबल तैनात होते असेही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी गुरमेल सिंहची आजी म्हणाली…
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एका आरोपीला कोठडी तर दुसऱ्या आरोपीचे वय…
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय…
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?
गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

