बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एका आरोपीला कोठडी तर दुसऱ्या आरोपीचे वय…

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) आणि माजी मंत्री यांची शनिवारी (ता.12) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (रविवार) आरोपींना न्यायालयात हजर केले असता सरकारी आणि आरोपींच्या वकिलांमध्ये बराच वेळ युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी गुरुनैल सिंग याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दुसऱ्या आरोपी असलेल्या धर्मराज कश्यप याचे वय तपासले जाणार आहे.

एका आरोपीचे वय 17 असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता. न्यायालयाने वकिलांचा युक्तिवाद गांभीर्याने घेत आरोपीची टेस्ट करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. ही टेस्ट होईपर्यंत आरोपी धर्मराज कश्यप पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. पोलिस ही टेस्ट करून आरोपीला पुन्हा कोर्टात हजर करा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

आरोपींनी पुणे आणि मुंबईत राहून बाबा सिद्धीकी यांची रेकी केली होती. या आरोपींना हत्यार कोणी दिले? वाहन कोणी दिले? याचा तपास होणे महत्वाचे आहे. या आरोपींकडून 28 जिवंत कातूस सापडली आहेत. मग फक्त बाबा सिद्धीकी यांनाच मारायचा हेतू होता की अन्य ही कोणाला मारण्याचा हेतू होता? यात अन्य दोन आरोपी फरार आहेत. हे कुठल्या गँगशी जोडलेले आहेत का? असे सवालही सरकारी वकिलांनी न्यायालयात उपस्थित केले आहेत. बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपी धर्मराज कश्यप याला न्यायमूर्तींनी वय विचारले असता त्याने स्वत:चं वय 17 सांगितले. अल्पवयीन आरोपी म्हणून ट्रीटमेंट मिळावी, अशी मागणीही वकिलांकडून करण्यात आली होता. त्यानंतर न्यायालयाकडून आरोपीचे वय तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

अभिनेता गोविंदा गोळीबार प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय…

अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?

गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!