
काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन घरफोडी चोरांना ठोकल्या बेड्या…
पुणे : काळेपडळ पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना अटक करून मुद्देमालासह जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरात कौतुक होत आहे.
दि. ३१/०१/२०२६ ते दि. ०२/०२/२०२६ या कालावधीत गंगेश्वर यादव यांच्या तरवडेवस्ती, महंमदवाडी, हडपसर येथील बंद घराचा दरवाजाचा कोयंडा उपसून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला होता. घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी यादव यांनी दि. ०२/०२/२०२६ रोजी काळेपडळ पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार गु.र.नं. ३७/२०२६ प्रमाणे घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील व तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विनायक गुरव यांनी तात्काळ तपास पथकाला गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले. पोलिस हवालदार प्रतिक लाहिगुडे यांनी तांत्रिक तपास केला, तर पोलिस अंमलदार अतुल पंधरकर व गिरीराज जगदाळे यांनी गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून माहिती गोळा केली.
मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून वैभव ऊर्फ बाब्या संजय गायकवाड आणि प्रशांत ऊर्फ चिक्या भारत कसबे (दोघे रा. साठेनगर, तरवडेवस्ती, पुणे) यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र कसून चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून चोरीस गेलेले १५.१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे रु. २,१८,८९०/-), २२०.६ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (किंमत अंदाजे रु. ६१,७४०/-) तसेच ओपो कंपनीचा मोबाईल (किंमत रु. ३,०००/-) असा एकूण रु. २,८३,६३०/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.
सदरची कामगिरी डॉ. राजकुमार शिंदे, पोलिस उप आयुक्त परिमंडळ ६ अनुराधा उदमले सहाय्यक पोलिस आयुक्त हडपसर विभाग (अति. कार्य) यांचे मार्गदर्शनाखाली मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काळेपडळ पोलिस स्टेशन यांचे सुचनेप्रमाणे स.पो.नि. अमित शेटे, पो.उप.नि. विनायक गुरव, पोलिस हवालदार प्रविण काळभोर, प्रतिक लाहिगुडे, दाऊद सय्यद, पंकज गाडे पोलिस अंमलदार अतुल पंधरकर, शाहिद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, महादेव शिंदे, नितीन ढोले, प्रदिप बेडिस्कर, सद्दाम तांबोळी, गिरीराज जगदाळे, अमोल जाधव यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
View this post on Instagram
पुण्यात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; दंड न भरल्यास थेट…
पुणे शहरात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; गॅलरीतून उडी मारताना महिलेचा मृत्यू…
पुणे! भिगवण प्रकरणातील युवतीबद्दल नवी माहिती समोर…
पुणे! शेअर मार्केटमधील गुंतवणुकदारांची कोटयावधी रुपयांची फसवणूक करणारा जेरबंद…

