
गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…
जळगाव : चाळीसगावमधील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. त्यांना एकूण सात गोळ्या लागल्या होत्या. उपचारादरम्यान आज (शनिवार) पहाटे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत ते गंभीर जाखमी झाले होते. त्यांना एकूण सात गोळ्या लागल्या होत्या. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना तातडीने नाशिकच्या अशोका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
चाळीसगावमधील स्टेशनरोड भागात वास्तव्य असलेले बाळू मोरे आनंदवाडी, शिंदी कॉलनी परिसरातून ते अपक्ष तसंच भाजपच्या तिकिटावरही नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. त्यांच्यावर गोळीबार का झाला हे अद्याप समोर आलेले नाही. सीसीटीव्हीच्या अधारे पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, राजकीय पदाधिकाऱ्यांवर मागील आठवडाभरात गोळीबाराच्या 3 घटना घडल्या आहेत. उल्हासनगर, चाळीसगाव आणि दहीसरमध्ये या घटना घडल्या. या तीन घटनेत दोन माजी नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. दहीसर गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला, तर आज महेंद्र मोरे यांचा देखील मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र हादरला! पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या नगरसेवकावर भाजप आमदाराकडून गोळीबार…
माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार…
पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…
भाजप आमदार गणपत गायकवाड यांना पोलिस कोठडी…
गँगस्टर शरद मोहोळ याचा CCTVसमोरच का केला खून…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

