
हृदयद्रावक! नांदेडमध्ये पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू…
नांदेड : नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात असलेल्या एका नाल्यातील पाण्यात बुडून चार लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृत मुलांचे वय ७ ते १० वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
देगलूर नाका भागात खोदकामासाठी करण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. परिसरातील काही मुलं खेळण्यासाठी त्या ठिकाणी गेली होती. खेळता खेळता ते पाण्यात पडले. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चारही मुलं बुडाल्याची भीषण घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून अशा धोकादायक ठिकाणी सुरक्षेची योग्य उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
हृदयद्रावक! नवविवाहित दांपत्याचा होरपळून मृत्यू; एका चितेवर तिघांचा अंत्यविधी…
हृदयद्रावक! नाशिकमध्ये गेट टुगेदरला गेले अन् घात झाला, 9 जणांचा जागीच मृत्यू; पाहा नावे…
हृदयद्रावक! पुण्यात पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान युवकाचा मृत्यू; स्वप्न अधुरे अन् वडील…
हृदयद्रावक! चिमुकल्याला पाठीवर घेऊन आई धावत सुटली पण नको ते घडलं…

