अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?

मुंबईः मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह करण्याचे मॉरिस नोरोन्हा याने निमित्त साधले. फेसबुक लाईव्हमध्ये दोघांनी सगळे जुने वाद संपवून पुन्हा एकत्र येऊन काम करायचे असे ठरले. मॉरिस आधी उठला, त्यापाठोपाठ अभिषेक घोसाळकर उठले तर त्यांच्यावर मॉरिसरने गोळीबार केला.

घोसाळकर आणि नोरोन्हा गुरूवारी (ता. ८) संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. लाईव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, त्याने पिस्तुल काढले आणि पुन्हा खोलीत शिरुन घोसाळकरांवर गोळीबार केला. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. एक दोन नाही तर तब्बल पाच गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. ते जीव वाचवण्यासाठी दरवाजाच्या दिशेनं धाव घेतली. त्यांनी पूर्ण ताकदीने दरवाजा फोडला आणि खाली पडले. या घटनेनं खळबळ उडाली. ही सगळी घटना घडली तेव्हा फेसबुक लाईव्ह तसंच सुरू होते. त्यानंतर नोरोन्हाने गोळी झाडून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी मॉरिसचा पीए मेहुल पारिख, रोहित साहू आणि मॉरिसच्या अंगरक्षकाला ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

गोळीबारानंतर मॉरिस कार्यालयातच बसून होता. बाहेर जाऊन आपण वाचणार नाही हे त्याला निश्चित माहिती होते. त्याने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र बंदुकीतून गोळी बाहेर आली नाही. तो वरच्या मजल्यावर गेला. तिथे त्याने गन पुन्हा लोड केली आणि त्याने स्वत: वर गोळी झाडून आयुष्य संपवलं आहे. हा सगळा थरार सव्वाचार मिनिटांचा होता. मॉरिसने अभिषेक यांच्यावर गोळी झाडल्यानंतर पुढच्या सव्वाचार मिनिटांनी त्याने स्वत:वर गोळी झाडली होती. शांत डोक्याने अभिषेक घोसाळकर यांना संपवण्याचा संपूर्ण प्लॅन तयार केला होता. फेसबुक लाईव्हमध्ये अभिषेक घोसाळकर यांची हत्या करुन सूड पूर्ण केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मॉरिस नोरोन्हा हा दहिसर-बोरिवली परिसरात राहतो. या भागात तो मॉरिस भाई म्हणून परिचीत होता. तो अनेकवेळा परदेश दौरेही करत होता. अमेरिकेतील लॉस एंजल्सवरून नुकताच तो आला होता. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्याने महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. ज्या भागाचं नेतृत्व अभिषेक घोसाळकर करतात, त्याच भागातून मॉरिस निवडणुकीची तयारी करत होता. मात्र घोसाळकर त्याला विरोधक ठरत होते.

दीड वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसचे भांडण झाले होते. मॉरिसवर बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. त्या प्रकरणात मॉरिसला 5 महिने तुरुंगात जावे लागले होते. मात्र बलात्कारासारख्या खटल्यात अभिषेक घोसाळकरांनीच अडकवल्याचा राग मॉरिसच्या मनात होता. त्याचा बदला घेण्याची भावना नेहमीच त्याच्या मनात होती, हे मॉरिसच्या पत्नीच्या जबाबावरुन सिद्ध होत आहे. मॉरिस नेहमी अभिषेक घोसाळकरांना सोडणार नाही हेच घरात बोलत असायचा असा जबाब मॉरिसच्या पत्नीने आज पोलिसांना दिला.

फेसबुक लाईव्ह करताना दोघेही हसत होतो, जनहिताच्या गोष्टी फेसबुक लाईव्हमधून करत होते. नव्या सुरुवातीचीही चर्चा दोघांनी केली. क्राईम ब्रांच युनिट 11नं मॉरिसच्या बायकोचा जबाब नोंदवला. त्यानुसार मॉरिसवर बलात्कारासह विनयभंग असे दोन गुन्हे होते. दोन्ही गुन्ह्यांमुळे मॉरिस येरवडा तुरुंगात जवळपास 5 महिने बंद होता. अटकेमागे अभिषेक घोसाळकर यांचा हात असल्याचा मॉरिसचा समज होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही मॉरिसाच्या मनात राग कायम होता. ‘मी अभिषेकला सोडणार नाही, त्याला संपवणारच’ असं अनेकदा बालायचा. मॉरिसच्या पत्नीचा जबाब आज पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी प्राथमिक चौकशीतून हत्येचे प्राथमिक कारण स्पष्ट होत आहे.

मॉरिसवर 2014 साली गंभीर आरोप सुरु झाले. मात्र, 2022 साली त्या प्रकरणात त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी झाली. 80 लाखांची फसवणूक, 48 वर्षीय महिलेचा बलात्कार, धमकी आणि ब्लॅकमेलिंग अशा गुन्हामध्ये त्याला अटक झाली. मॉरिस तुरुगांतून बाहेर आल्यानंतर राजकीय मंचांवर दिसू लागला. कोरोना काळात त्यांने सामाजिक कामांमध्येही पुढाकार घेतला. त्यासाठी त्याला कोरोना योद्धा म्हणून सामाजिक पुरस्कारही मिळला. पुढे हाच मॉरिस नोरोन्हाचा मॉरिस भाई झाला. आणि मग काय, सर्वपक्षांच्या नेत्यांसोबत त्याचे फोटो सुरु झाले. तेच फोटो विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी व्हायरल केले होते.

गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

महाराष्ट्र हादरला! पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या नगरसेवकावर भाजप आमदाराकडून गोळीबार…

माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार…

मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!