गुवाहाटीच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी मराठी पोलिस अधिकाऱ्याकडे…
आसाम : महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडून 40 बंडखोर आमदारांना सोबत घेऊन शिवसेना नेते एकनाथ शिंदे ज्यावेळी गुवाहाटीत पोहचले त्यावेळी तेथील कायदा – सुव्यवस्था पाहण्याची जबाबदारी एका मराठी पोलिस अधिकाऱ्यावरच होती. ते अधिकारी म्हणजे सहायक पोलिस महानिरीक्षक डॉ. धनंजय घनवट. ते मुळचे बारामती येथील रहिवासी आहेत.
डॉ. धनंजय घनवट हे आसाम पोलिस दलात सहायक पोलिस महानिरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला एकसंघ करण्यासाठी आयपीएस कॅडर निर्माण केली होती. भारत ऑल इंडीया सर्व्हीसमधून एकदा कॅडर मिळाले की तेथील मातीतील होऊन आपल्याला सेवा करायला मिळते. गेले 12 वर्षे आपण आसाममध्ये काम करीत असून ही आपली आठवी पोस्टींग असल्याचे डॉ. धनंजय घनवट यांनी सांगितले.
‘आसामचा इतिहास दंगली आणि बॉम्बस्फोटांचा होता. नव्वदच्या दशकात येथील परिस्थिती अस्थिर होती. परंतू आता अनेक जणांच्या बलिदानानंतर परिस्थिती सुधारली आहे. आसामचे गुवाहाटी हे नॉर्थ इस्टचा गेटवे म्हटले जाते. अंलमी पदार्थाच्या तस्करीचा हा गोल्डन ट्रँगलचा भाग असल्याचे म्हटले जाते. परंतु, देशातील सगळ्या पोलिस संघटनामध्ये आसाम पोलिसांनी ड्रग्ज सप्लाय रोखण्यात मोठी भूमिका बजावली आहे. एका मोठ्या राज्याचा मंत्री 40 आमदारांना घेऊन येतो तेव्हा सुरक्षा राखणे आव्हानात्मक जबाबदारी होती. आसाम पोलिसांसाठी हे चॅलेंज अत्यंत प्रोफेशनली हाताळले. हा प्रदेश निसर्ग सौदर्याने नटलेला असल्याने लोकांनी आसामला येऊन तो पहावा,’ असेही घनवट यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हटले आहे.
पोलिस अधिकारी कपल जोडीचा प्री-वेडिंग Video Viral…
कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी
क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
पोलिस दलात SPचे अधिकार आणि कार्य काय? पगार किती; घ्या जाणून…
अनिकेत पोटे : ‘फिटनेस’बाबत दक्ष अधिकारी!
पाचव्या प्रयत्नात IPS! ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये जिंकले होते एक कोटी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!