अभिनेत्रीचा आढळला मृतदेह; प्रेमसंबंधातून आत्महत्या…

मुंबई : प्रसिद्ध बांग्लादेशी अभिनेत्री हुमैरा हिमू (वय ३७) हिचा मृत्यू झाल्यामुळे चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली आहे. तिच्या निधनाने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. पोलिस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.

अभिनेत्री मृतावस्थेत आढळल्यानंतर तिला त्वरित ढाका येथील उत्तरा आधुनिक मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर मृत घोषित केले. अभिनेत्रीच्या गळ्यावर हलके निशाण आढळून आले आहेत. त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली असून, अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अभिनेत्री हुमैरा हिचे निधन झाल्यानंतर तिचा एक मित्र तिला रुग्णालयात घेऊन आला होता. परंतु, पोलिस रुग्णालयात येण्याआधीच तो तिथून निघून गेला. अभिनेत्रीच्या त्या मित्राचा शोध घेत आहेत. अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं? तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे हे शवविच्छेदन अहवालातून समजू शकेल.’

दरम्यान, अभिनेत्रीचे एका युवकावर प्रेम होते. 2 नोव्हेंबरला दुपारी त्यांच्यात भांडणं झालं आणि त्यानंतर अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.

अभिनेत्री हुमैरा हिमू हिने 2011 साली ‘अमर बंधु राशेद’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. 2006 मध्ये तिने टेलिव्हिजनच्या माध्यमातून करिअरची सुरूवात केली होती. ‘बारी बारी साडी साडी’, ‘हाउसफुल’, ‘गुलशन एवेन्यू’सारख्या हिट मालिकेत तिने काम केले होते.

हृदयद्रावक! गरोदर अभिनेत्रीने बाळाला न पाहताच घेतला जगाचा निरोप…

प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…

ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा…

अभिनेता शाहरुख खानला सरकारने पुरवली Y+ स्कॉट सुरक्षा; कारण…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!