पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट १ने केले जेरबंद…

पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड पोलिस स्टेशन हद्दीमधील आरोपी गेल्या ३ वर्षांपासून राहण्याची जागा बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. गुन्हे शाखा युनिट १ अखेर फरारी आरोपीस जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

चिखली पोलिस ठाणे गु. रजि.नं. १६३/२०२१ भादंवि कलम ३७९, ३४ या गुन्हयातील सीआरपीसी कलम ८२ प्रमाणे गुन्ह्यातील फरारी आरोपी विलास बाळशीराम मोरे, (वय ३८, रा. संतोष फुगे यांच्या रुममध्ये भाडयाने, दिघी रोड, भोसरी पुणे) हा सुमारे ३ वर्षांपासून राहण्याची जागा बदलुन पोलिसांना गुंगारा देत होता. गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार बाळु कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, अजित रुपनवर यांनी आरोपी विलास बाळशीराम मोरे याचा शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषन करुन गोपनिय माहिती काढून ताब्यात घेतले आहे. आरोपी विलास बाळशीराम मोरे याच्याकडे केलेल्या चौकशी दरम्यान त्याचेवर चिखली, एमआयडीसी भोसरी, दिघी पोलिस ठाणे येथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे, सहाय्यक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलिस अमंलदार बाळु कोकाटे, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, बाळु कोकाटे, अमित खानविलकर, गणेश महाडिक,मनोजकुमार कमले, फारुक मुल्ला, सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, अजित रुपनवर, स्वप्नील महाले, विशाल भोईर, तानाजी पानसरे तांत्रिक विश्लेषक पोलिस अमंलदार नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.

शेअर मार्केट! पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चौघांना केली अटक; धागेदोरे बँकॉक पर्यंत…

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दरोडयातील आरोपी २४ तासात केले जरेबंद; पाहा नावे…

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीकडून पकडल्या ११ मोटारी; पाहा क्रमांक…

पिंपरी-चिंचवड हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपींना भोसरी पोलिसांनी केले जेरबंद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!