वर्धा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून युवतीची घराबाहेरच हत्या; गावकऱ्यांनी…

वर्धा : एकतर्फी प्रेम प्रकराणातून एका 23 वर्षीय युवतीची तिच्याच घराबाहेर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे सोमवारी (ता. २) रात्री घडली आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असल्याची चर्चा गावकाऱ्यांमध्ये आहे.

नालवाडी येथील दोन युवक आणि दोन युवती दहेगाव गोसावी येथे आले होते. दोन मुलींनी मृत मुलीच्या घराच्या गेटजवळून बाहेर येण्यासाठी आवाज दिला. यानंतर युवती घराबाहेर आली. घराबाहेर अंगणात दबा धरून बसलेल्या दोन्ही युवकांनी पाठी मागून येऊन चाकूने युवतीच्या गळ्यावर सपासप वार केले. युवती जोरात ओरडल्यामुळे घरातील लोक बाहेर आले. मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ जखमी युवतीला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, चाकूने वार करून पळ काढणाऱ्या दोन युवकांसह सोबतच्या दोन मुलींना गावकऱ्यांनी पाठलाग करून पकडले. गावकऱ्याांनी चौघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यानंतर दहेगाव येथील पोलीस स्टेशन परिसरात गावकरी एकत्र जमले आणि कडक कारवाईची मागणी केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…

एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…

मला माझीच लाज वाटते; गुड बाय साकिब; माझं तुझ्यावर प्रेम आहे…

‘प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…

मी मेल्यावर तू रडशील का? असे स्टेटस ठेवून घेतला जगाचा निरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!