पोलिसकाका Video News: २४ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…

‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाकडून अटक वॉरंट
पुणेः पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी मनोज जरांगे-पाटील यांच्यासह अन्य दोघांविरोधात कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्याने मनोज जरांगे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

आयएएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल
पुणेः आयएएस अधिकारी बनण्यासाठी खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप झालेल्या पूजा खेडकर आता नॉट रिचेबल झाल्या आहेत. त्यांना मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. शिवाय, यूपीएससी परीक्षेत फायदा व्हावा यासाठी तिच्या आई-वडिलांनी घटस्फोटाचा बनाव रचला का याची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

ससून रुग्णालयातील डॉक्टरचं रुग्णासोबत धक्कादायक कृत्य
पुणेः ससून हॉस्पिटल मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या सामाजिक संस्थांकडून बेवारस तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना ससून रुग्णालयात उपचारासाठी सोडतात अशा रुग्णांवर उपचार न करता त्यांना ससूनमधील डॉक्टरांकडून बेवारस ठिकाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत ससून हॉस्पिटल मधील डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्यांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सांवतवाडीत महाविद्यालयीन युवतीच्या अंगावर झाड कोसळल्याने मृत्यू
सिंधुदुर्ग : सांवतवाडी तालुक्यात एका महाविद्यालयीन युवतीच्या अंगावर झाड कोसळल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सायली धुरी असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अभिनेत्यावर दिवसाढवळ्या गुंडांचा हल्ला; लुटण्याचा प्रयत्न
मुंबई : अभिनेता माहिर पांधी याच्यावर मुंबईत गुंडांनी हल्ला केला आहे. गुंडांनी गाडीची तोडफोड करण्याचा आणि लुटण्याचा प्रयत्न केल्याचे माहीरने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले आहे.

वानवडी पोलिसांनी जागेच्या फसवणूकप्रकरणी एकाला केली अटक
पुणे : जागेचा बनावट करारनामा व कधीही रद्द न होणारे बनावट कुलमुख्त्यार तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी हेमंत बागेरेड्डी मोटाडू याला अटक केली आहे. जयप्रकाश सिताराम गोयल यांनी फसवणूकीबाबत तक्रार दाखल केली होती.

लोणीकंद भागात पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या
पुणेः लोणीकंद भागात नवऱ्याने मध्यरात्री बायकोची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मीबाई जाधवराव असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती बाबा जाधव याला अटक केली आहे.

लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा अपघातात मृत्यू
मॉस्को (रशिया): सोशल मीडियावर MotoTanya या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तात्याना ओझोलिनाचा हिचा अपघातात मृत्यू झाला आहे. तात्याना ही रशियाची रहिवासी होते. सोशल मीडियावर तिचे जगभरात मोठ्या प्रमाणात चाहते होते.

विकास द्विवेदी याच्या सर्पदंशाचे वाढत चालले गुढ
लखनौ: उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथील विकास द्विवेदी याचा साप पाठलाग सोडत नाही. त्याच्या सर्पदंशाच्या घटनेचे गूढ वाढत चालले आहे. विकासला आतापर्यंत आठ वेळा सर्पदंश झाला आहे. आठ वेळा सर्पदंश झाल्यानंतर तो वाचेल; पण नवव्या वेळेला सर्पदंश झाल्यावर त्याचा मृत्यू होईल, असे सापाने स्वप्नात सांगितल्याचे विकासने सांगितले आहे.

हवाई दलातील जवानाने केली वृद्ध आईची निर्घृण हत्या
चंदीगड (हरियाणा): हवाई दलातल्या एका जवानाने त्याच्या वृद्ध आईची निर्घृण हत्या केली. जवानाच्या पत्नीने त्याच्यावर हत्येचा आरोप करून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिस तपास करत आहेत.

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!