
लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहीले की…
पुणे : प्रसिद्ध लेखक राजन खान यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. डेबू राजन खान (वय २८) असे त्याचे नाव आहे. तो आयटी अभियंता होता. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. डेबू खान याने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहीली आहे, यामधून त्याच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.
पुणे शहरातील सोमटने फाटा येथे ही घटना सोमवारी (ता. २) सायंकाळी ही घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचनेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे, तसा उल्लेख आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने केला आहे.
राजन खान यांचा मुलगा डेबू आयटी अभियंता होता, तो सोमटने फाटा येथे एकटाच राहात होता. सोमवारी सकाळपासून त्याने घराचा दरवाजा उघडला नव्हता. दुपारी घर मालकिणीने डेबूच्या भावाशी संपर्क साधला. भावाने ही डेबूशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तो न झाल्याने पुण्यात राहणाऱ्या भावाने सोमटने फाटा येऊन घराचा दरवाजा वाजवला. पण, घरामधून डेबूने काहीच प्रतिसाद दिला नाही. अखेर, तळेगाव पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता, बेडरूममधील पंख्याला डेबूने गळफास घेतल्याचे समोर आल्यानंतर भावाला धक्का बसला.
डेबूने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागलेली आहे. त्यात आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण केल्याचे अन त्यातून फटका बसल्याचा उल्लेख आहे. तसेच ज्यांच्याशी पैशांची देवाण-घेवाण केली, त्यांची नावे ही नमूद केली आहेत. आता त्याच आधारावर तळेगाव पोलिस पुढील तपास करत आहेत. डेबूचं शवविच्छेदन करून मृतदेह लेखक राजन खान यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
दुसऱ्या विवाहाचे फोटो ठेवले स्टेटसला, पहिल्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…
महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…
पुणे हादरले! अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग अन् आत्महत्या…
पुणे शहरात बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीची हत्या करून मेव्हण्याची आत्महत्या…
कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या…