नीलिमा चव्हाण हिच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक कारण आले समोर…
रत्नागिरी : नीलिमा चव्हाण हिचा शव विच्छेदनाचा अहवाल पोलिसांच्या हाती आला असून, या अहवालानुसार तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने दबावाखाली आत्महत्या केल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
दापोली येथील एका बँकेत कामाला असणारी नीलिमा चव्हाण 29 जुलै रोजी आपल्या ओंबली गावी निघाली होती. ती खेड येथून बेपत्ता झाली होती. यानंतर एक ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह दाभोळ खाडीत आढळल्या नंतर खळबळ उडाली होती. निलिमाच्या डोक्यावरचे केस गेल्याने तिच्या नातेवाईकांनी घातपात असल्याचा आरोप केला होता, त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी 104 साक्षीदार तपासले होते.
नीलिमा चव्हाण हिच्या शरिरावर कुठेही जखमा आढळल्या नव्हत्या. विष अहवालात शरिरात कोणतेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले होते, त्यामुळे तिच्या शव विच्छेदन अहवालाची प्रतीक्षा होती. आता हा अहवाल प्राप्त झाला आहे. हा अहवाल दापोली उपजिल्हा रुग्णालयात आला असून त्यात तिचा मृत्यू बुडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, नीलिमा चव्हाण ही एका मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेच्या दापोली शाखेत कंत्राटी पद्धतीने काम करत होती. त्याच बँकेतील एक कर्मचारी तिच्यावर वारंवार कामासाठी दबाव टाकत होता, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलिस प्रशासनाकडे दिली. नीलिमा शेवटचे दांपत्याला भेटल्यानंतर एक मुलगी तिच्या हाताला धरून बसमध्ये चढत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तसेच नीलिमा चव्हाण ही एका तरुणाला शेवटचं भेटली होती अशी ही माहिती समोर आली होती. पण, काही दिवसापूर्वी निलीमाने एका तिच्या मित्राला मी जीवनाला कंटाळले आहे, असा मेसेज केला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे वाढले गूढ; संशय बळावला…
पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू…
धक्कादायक! राजगडावर अजयचा मृतदेह पाहून मित्र घाबरले…
बँक कर्मचारी नीलिमा घरी पोहचलीच नाही; आढळला मृतदेह…
पिता-पुत्राच्या संशयास्पद मृत्यूनंतर धक्कादायक माहिती आली पुढे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…