पुणे शहरात व्हिडीओ whatsapp ग्रुपला टाकून रिक्षाचालकाने उचलले मोठे पाऊल…

पुणे : कोंढवा भागातील रिक्षाचालकाने मालकाच्या त्रासाला कंटाळून राहत्या घराच्या पाचव्या मजलावरून उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांने एक व्हिडीओ शुट करुन Whatsapp ग्रुपवर शेअर केला. या घटनेमुळे संपूर्ण रिक्षाचालकांडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तोहिद शेख असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचलकाचे नाव आहे.

तोहिद शेख हा एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत होता. अरबाज वली मोहम्मद मेमन असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. शेख हा चार वर्षांपासून त्यांच्याकडे काम करत होता. मेमन आणि शेख याचा वाद झाला होता. त्यानंतर मेनन यांनी शेख याला सासऱ्यांसमोर शिवीगाळ केली. याचा राग आल्याने शेख याने व्हिडीओ तयार करुन 6 व्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

आज सकाळी साडे आठच्या दरम्यान त्याने आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ ‘बघतोय रिक्षावाला कोंढवा’ गृपवर टाकला आणि बिल्डिंग वरून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर या ग्रुपवरील लोकांनी त्वरित त्याला कॉल करायला सुरवात केली. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता.

व्हिडीओमध्ये तोहिद शेख हा त्याच्यासोबत घडलेला प्रसंग सांगत आहे. काम करताना मेनन काहीही बोलायचा मानसिक छळ करायचा. शेखच नाही तर बाकी सर्व कर्मचाऱ्यांनादेखील मेनन खालची वागणूक देत होता. त्यानंतर शेख आणि मेनन यांचा वाद झाल्यानंतर शेखला मारुन टाकण्याची धमकी देत होता. माझी कोणी तक्रार दाखल करुन घेणार नाही, असे म्हणत मेनन अनेकांना धमकवायचा, असे अनेक आरोप शेख याने व्हिडीओत केले आहेत. पाचशे रुपयांसाठी मेनन याचे टॉर्चर केल्याचेही व्हिडीओत शेख याने सांगितले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू…

हृदयद्रावक! पुणे शहरात चहा पित असताना डोक्यावर पडली झाडाची फांदी…

पुणे शहरात कुत्र्याचा मृत्यू, दोन डॉक्टरासह चार जणांवर गुन्हा दाखल…

पुणे शहरात युवकाला नग्न करुन लावलं नाचायला अन् पुढे…

पुणे शहरात गरोदर असल्याचे सांगून युवकाकडे मागितली खंडणी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!