
गोंदियामध्ये मृत पोलिसकाकाच्या कुटुंबियांना धनादेशाचे वाटप…
गोंदिया: अपघात व दीर्घ आजाराने निधन झालेले पोलिस अंमलदार यांचे कुटुंबीय यांना पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांचे हस्ते 10 लक्ष रुपयांचे “प्रतिकात्मक धनादेशाचे” वाटप करण्यात आले.
पोहवा/1025 रविंद्र हेमराज पारधी, नेमणुक पो.स्टे. नवेगावबांध यांचा दिनांक 14/05/2022 रोजी सायंकाळी पो.स्टे. गोंदिया ग्रामीण हद्यीत अपघात झाला होता. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर 05/12/2022 रोजी त्यांचे राहते घरी मौजा श्री. समर्थ कॉलनी, गोंदिया येथे निधन झाले होते.
संचालक विमा संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडुन “राज्य शासकिय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत रूपये 10,00,000/- (दहा लक्ष रूपये)मंजुर करण्यात आल्याने 11/03/2024 रोजी पोलिस अधिक्षक कार्यालय, गोंदिया येथे पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे व पोलिस उप-अधीक्षक (मुख्या.) गोंदिया नंदिनी चानपुरकर यांच्या हस्ते नामनिर्देशित व्यक्ति लाभधारक म्हणून त्यांची पत्नी- श्रीमती शुभांगी रविंद्र पारधी यांना विमा दाव्याची रक्कम रूपये 10,00,000/- (दहा लक्ष रूपये) चे “प्रतिकात्मक धनादेश वाटप करण्यात आले आहे.
महिला पोलिस कर्मचाऱ्यास शस्त्रक्रियेसाठी 50 लाखांची वैद्यकीय मदत मंजूर!
गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १७ जनावरांची केली सुटका…
गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या २४ जनावरांची केली सुटका…
बकऱ्यांची चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

