पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात बुडून वडील आणि मुलीचा मृत्यू…

पुणे : पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणात वडील आणि मुलगी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून वडील अद्याप बेपत्ता आहेत. ऐश्वर्या धर्माधिकारी (वय 13) आणि शिरीष धर्माधिकारी (वय 45, रा. बालेवाडी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

बालेवाडी येथे राहणारे फालक आणि धर्माधिकारी कुटुंब 15 ऑगस्ट रोजी भोर तालुक्यातील जयतपाड गावातील मुंगळे रिसॉर्ट या ठिकाणी गेले होते. मंगळवारी (ता. १५) दुपारी चारच्या सुमारास सर्व जण सीमा फार्म हाऊच्या मागे असणाऱ्या भाटघर धरणाचे बॅक वॉटर पाहायल गेले होते. शिरीष धर्माधिकारी आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या हे भाटघर धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही खोल पाण्यात पोहत असताना बुडाले.

यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु केले. त्यांनी ऐश्वर्या हिला बाहेर काढले. तिला भोरमधील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शिरीष धर्माधिकारी यांचा शोध सुरू होता. अखेर, त्यांचाही मृतदेह आढळून आला आहे.

दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी मित्रांसोबत फिरायला गेलेल्या आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हर्षित पोटलुरी (वय 27) असे मृत्यू पडलेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे. शिवाय, राजगडावरही एका युवकाचा पाण्यात पडून मृत्यू झाला आहे.

नीलिमा चव्हाण हिच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक कारण आले समोर…

पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू…

धक्कादायक! राजगडावर अजयचा मृतदेह पाहून मित्र घाबरले…

प्रेम प्रकरणातून नदीत उडी मारलेल्या युवकाचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!