
लातूर हादरलं! प्रेमप्रकरणातून वाद अन् इंस्टाग्रामवरून धमक्या; सुसाईड नोटमध्ये…
लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील मोरवड येथे प्रेमप्रकरणातून सुरू झालेल्या वादानंतर इंस्टाग्रामवरून होत असलेल्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तेजस दिलीप घोडके (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही जणांकडून सतत मानसिक त्रास दिला जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
तेजसचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. यानंतर सोशल मीडियावरून धमक्या देणे, बदनामीची भीती दाखवणे तसेच मानसिक दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून तेजस याने मोरवड येथे गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 178/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 108 व 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत युवकाच्या वडिलांनी फिर्याद दिली असून, सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
लातूर! नवऱ्याचे अनैतिक संबंध अन् प्रेयसीला अडकविण्यासाठी जीव गेला चिमुकल्याचा…
लातूर! पोलिस अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या…
लातूर! नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग सापडलं अन् पत्नीने उचलले मोठे पाऊल…
लातूर! धाब्यावर चिकन अन् दारू पाजली अन् जाळून मारलं पण कानून के हात लंबे होते है…

