सिक्किममध्ये ढगफुटी! लष्कराचे 23 जवान बेपत्ता…
गंगटोक (सिक्कीम): सिक्कीममध्ये अचानक झालेल्या ढगफुटीनंतर तीस्ता नदीला पूर आला आहे. यामध्ये भारतीय लष्कराचे 23 जवान बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाकडून या भागात युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरु आहे.
सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे प्रशासानाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे लष्कराचेही नुकसान झाले आहे. गुवाहाटीतील संरक्षण पीआरओंनी दिलेल्या माहितीनुसार, ‘उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावाला अचानक पूर आला. यामुळे 23 जवान बेपत्ता आहेत.’
23 army personnel have been reported missing due to a flash flood that occurred in Teesta River in Lachen Valley after a sudden cloud burst over Lhonak Lake in North Sikkim: Defence PRO, Guwahati https://t.co/zDabUMrCaI pic.twitter.com/uWVO1nsT2T
— ANI (@ANI) October 4, 2023
गुवाहाटीतील संरक्षण पीआरओंनी सांगितलं की, ‘उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावाला अचानक पूर आला. यामुळे 23 जवान बेपत्ता आहेत. चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने डाउनस्ट्रीमच्या पाण्याची पातळी अचानक 15-20 फुटांपर्यंत वाढली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभी असलेली लष्करी वाहने वाहून गेली आहेत. यामुळे लष्कराचे 23 जवान बेपत्ता तर 41 वाहने वाहून गेली आहेत.
भाजप नेते उग्येन त्सेरिंग ग्यात्सो भुतिया यांनी सांगितले, ‘सरकारी यंत्रणा शोध आण बचावकार्यात गुंतले आहे. बेपत्ता नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नाही, पण सिंगताममध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. काही लोक बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’
#WATCH | Sikkim: A flood-like situation arose in Singtam after a cloud burst.
(Video source: Central Water Commission) pic.twitter.com/00xJ0QX3ye
— ANI (@ANI) October 4, 2023
कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…
Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…
जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…
हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…