महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित महाराजाला अटक…
धाराशिव : मलकापूर (ता. कळंब) येथील स्वयंघोषित महाराज एकनाथ सुभाष लोमटे यांना येरमाळा पोलिसांना अटक केली आहे. आले आहे. धाराशिव दर्शनासाठी आलेल्या महिलेस खोलीमध्ये बोलावून घेत विनयभंग करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रुचून लोमटे महाराजाला पंढरपूरमधून अटक केली आहे.
दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे एकनाथ लोमटे महाराजाविरोधात 28 जुलै 2022 रोजी पीडित भक्त महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लोमटे महाराजांविरोधात येरमाळा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिला मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर मलकापूर संस्थांनचे सर्वेसर्वा राष्ट्रसंत तसेच भाविकांच्या सर्व समस्येवर उपाय करणारे स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज यांच्या दर्शनासाठी परळी येथील 35 वर्षीय महिला मठातील दक्षिण मंडपात गेली होती. यावेळी महाराजांनी महिलेस प्रवच खोलीमध्ये बोलून घेत महिलेचा विनयभंग केला होता.
दरम्यान, या घटनेने मंदिर परिसरामध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. यावेळी महाराजांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्याच रात्री एक वाजता सुमारात महिलेच्या तक्रारीवरून महाराजांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अटक ही झाली होती. मात्र त्यांची जामीनवर सुटका झाली. पीडित भाविक महिला अत्याचार प्रकरणी न्यायालयामध्ये दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशाने एकनाथ महाराज याला पीडित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांना अटक करण्यात आदेश दिले होते. त्यानुसार लोमटे महाराजाला अटक केली आहे.
भक्त महिलेच्या विनयभंग प्रकरणात लोमटे महाराज याला अटक झाल्याने धार्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. लोमटे महाराजांनी किती महिला भक्तांची फसवणूक केली हे तपासात उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले. लोमटे महाराजांवर या पूर्वीही जादूटोणा आणि लोकांना फसवल्याचे गुन्हे दाखल आहेत.
इंदुरीकर महाराज यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका…
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला खून अन् मृतदेह लपवला…
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?
भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला: अशोक इंदलकर
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…