RPF शिपाई चेतन सिंह याने बुरखा घातलेल्या महिलेला बंदुकीच्या धाकावर…
मुंबई : मुंबई-जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चार जणांची हत्या करणारा आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याने एका बुरखा घातलेल्या महिलेला बंदुकीच्या धाकावर ‘जय माता दी’ म्हणण्यास भाग पाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या बोरिवलीच्या जीआरपीला त्या महिलेने आपला जबाब दिल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF जवान चेतन सिंह याने 31 जुलै 2023 रोजी केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये आरपीएफ कर्मचारी आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. चेतन सिंहने AR-M1 रायफलने चौघांची हत्या केली होती. चेतन सिंह हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. संबंधित महिला ही एक्स्प्रेसमधील गोळीबार प्रकरणातील प्रमुख साक्षीदार आहे. जीआरपी पोलिसांनी या महिलेची ओळख पटवली असून तिचा जबाब घेतला आहे. शिवाय तपास पथकाने ट्रेनमधील काही सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले होते. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या आणि गुन्ह्याचे साक्षीदार असलेल्या वेगवेगळ्या लोकांचे जबाबही जीआरपी पोलिसांनी नोंदवले आहेत.
महिलेने जबाबात सांगितले की, ‘चेतन सिंह याने माझ्यावर बंदूक रोखली आणि ‘जय माता दी’ म्हणण्यास भाग पाडले. आपण जय माता दी म्हणूनही त्याचं समाधान झाले नाही. त्यामुळे त्याने मला पुन्हा मोठ्या आवाजात ‘जय माता दी’ म्हणण्यास सांगितले.
दरम्यान, आरोपी चेतन सिंहच्या नियमित वैद्यकीय तपासणीत त्याला कोणताही गंभीर मानसिक आजार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असे जीआरपीने यापूर्वी सांगितले होते.
RPF आरोपीचा अजब दावा; रेल्वेमधील हत्याकांडाचा घटनाक्रम…
जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF कॉन्स्टेबलकडून गोळीबार, चार जणांचा मृत्यू…
जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणाऱ्याने मित्राला सांगितले होते की…
हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…