नाशिकमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने लावला अपहृत मुलीचा शोध…

नाशिकः नाशिकमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मानवी कौशल्याचा वापर करून गुप्त माहितीदारांकडून सातत्याने पाठपुरावा करून अपहृत मुलगी व संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सातपूर पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. अल्पवयीन मुलीचे 29/12/2023 रोजी अपहरण झाले असून, सुमारे चार महिन्यापासून बेपत्ता होती. सदर गुन्हयाचा समांतर तपास AHTU कडील पथक करीत होते. अपहृत मुलगी व संशयित आरोपी यांचे वास्तव्याबाबत मानवी कौशल्याचा वापर करून गुप्त माहितीदारांकडून सातत्याने पाठपुरावा केला. सदर मुलगी व संशयित आरोपी हे अंबड सिडको नाशिक येथे असल्याबाबत माहिती मिळवली. सदर ठिकाणी जाऊन अपहृत मुलीचा व संशयित आरोपीचा शोध व तपास केला असता सदर अपहृत मुलगी व तिच्यासोबत राहणारा मुलगा कुमार विलास पालवी (वय 21, रा. चाचडगाव ता. दिंडोरी जिल्हा नाशिक) हे दोघेही पवन नगर अंबड सिडको नाशिक येथे मिळून आहे.

पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले व 15/04/2024 रोजी पुढील योग्य त्या कारवाईकामी सातपूर पोलिस स्टेशनला हजर केले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने अटक वारंट मधील आरोपीस शिताफीने केले जेरबंद…

नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ची धडाकेबाज कामगिरी; लाखो रुपयांचा गुटखा जप्त…

नाशिकमध्ये क्रिकेट मॅचवर बेटींग करणारा सराईत पोलिसांच्या ताब्यात…

नाशिक पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसांसह एकाला केली अटक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!