दोन कंटेनरांच्यामध्ये कार सापडली; सहा जणांचा चिरडून मृत्यू…
चंदीगड (पंजाब): मलेरकोटलामध्ये बुधवारी (ता. १) दोन कंटेनरांच्यामध्ये एका कार सापडल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील सहा जणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला आहे. हे सर्वजण एकाच गावातील होते.
मलेरकोटला येथूवन बाबा हदर शेख दर्ग्य़ाहून ते घरी परतत होते. संगरुरपासून १५ किमी अंतरावरील मेहला चौक भागात हा अपघात झाला. दोन मोठे कंटेनर वाहतूक करणारे ट्रक एकमेकांवर आदळले. यामध्ये ही कार सापडली.
या अपघातात एका लहान मुलाचाही मृत्यू झाला आहे. रात्री २ वाजता हा अपघात झाला. हे सर्व सुनामला जात होते. कारचा चेंदामेंदा झाल्याने पोलिसांनी वेल्डिंग करण्याच्या मशीनने कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले. यानंतर हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.
मृतांमध्ये दीपक जिंदल, नीरज सिंगला आणि त्यांचा मुलगा, लक्की कुमार, विजय कुमार व दवेश जिंदल यांचा समावेश आहे. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बीडमध्ये भीषण अपघात; रुग्णवाहिकेतील चौघांचा तर ट्रॅव्हल्समधील सहा जणांचा मृत्यू…
पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू…
दसऱ्याच्या दिवशी मोटार अपघातात कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू…
नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!