पुणे शहरात युवकाला नग्न करुन लावलं नाचायला अन् पुढे…

पुणे : पुणे शहरात युवकाला कपडे काढून नाचायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाय, युवकाचा नग्न अवस्थेत नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल केला असून, युवकाकडून 60 हजार रुपये उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

एका 33 वर्षीय युवकाने पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून सोमनाथ कोंडीबा राजभोज, चंद्रकांत बबन लांडगे, संजय आत्माराम सुतार, सुभाष हनुमंतराव भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर आयपीसी 392, 427, 500, 506, 34 सह आयटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपी आणि तक्रारदार एकाच गावातील आहे. त्यांनी गावातील व्हॉट्सअॅप गृपवर हा नग्न व्हिडीओ शेअर केला. आरोपी असलेल्या सोमनाथने तक्रारदाराला भावाचे कारण देत घरी नेले. त्याला थेट कपडे काढायला सांगितले. बाकी सगळे सहकारी त्याची मजा घेत होते. त्यानंतर सगळ्यांनी मिळून त्याला जबरदस्तीने नाचायला लावले. तो नाचत असताना त्याचे व्हिडीओ काढले. शिवाय, तक्रारदाराचा मानसिक छळ करुन त्यांच्याकडून 60 हजार रुपये घेतले आणि त्याला मोबाईल जाळला आहे. गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास करत आहोत.’

दरम्यान, तक्रारदार आणि आरोपी एकाच गावातील आहे. त्यांनी आपल्याच मित्रासोबत हा प्रकार केला आणि गावातील Whatsapp गृपवर शेअर केला. त्यामुळे तक्रारदाराची गावात बदनामी झाली आहे. हाच व्हिडीओ पाहून आणि या प्रकाराला कंटाळून युवकाने तक्रार दाखल केली आहे.

Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…

पुणे शहरात मैत्रिणीला भेटण्यासाठी घातला बुरखा अन् पुढे…

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

पुणे शहरात गरोदर असल्याचे सांगून युवकाकडे मागितली खंडणी…

पुणे शहरात महागड्या सायकली चोरणाऱ्या सुशिक्षीत बंटी-बबलीस अटक…

पुणे जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पतीचा खून…

पुणे शहरातील आजोबा कॉल गर्लला भेटले अन् पुढे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!