मित्राचा वाढदिवस हाता साप देऊन थरारक पद्धतीने साजरा गेले अन्…
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात मित्राचा वाढदिवस थरारक पद्धतीने साजरे करणे महागात पडले आहे. वाढदिवसाच्या दिवशी हातात विषारी साप घेऊन फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याने युवकाचा साप चावल्याने मृत्यू झाला आहे.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
चिखली शहरातील गजानन नगर येथील रहिवासी संतोष जगदाळे या युवकाचा 5 जुलै रोजी वाढदिवस होता. पारंपारिक पद्धतीने घरात वाढदिवस साजरा केल्यानंतर मित्राचा वाढदिवस थरारक पद्धतीने साजरा करण्यासाठी शेजारील मित्र सर्पमित्र आरिफ खान रईस खान आणि धीरज पंडितकर यांनी संतोष याला वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर घेऊन गेले होते. संतोषच्या हातात विषारी साप दिला. चिडलेल्या सापाने संतोष जगदाळेला जोरदार दंश केला, त्यातच त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली. दोन्ही मित्रांनी त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी भरती देखील केले. मात्र उपचार पूर्ण न करता मित्रांनी रुग्णालयातून त्याची सुट्टी करून घेतली, त्यानंतर संतोषची प्रकृती खालावली आणि त्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला.
संतोषच्या वडिलांनी चिखली शहर पोलीस स्टेशनमध्ये सर्पमित्र आरिफ खान रईस खान आणि धीरज पंडितकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. भारतीय न्याय संहितेच्या कलम 105 3 उपकलम पाच अन्वये दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात वाढदिवसाचा केक तलवार व कोयत्याने कापला अन् बड्डे बॉयसह…
बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…
ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…
महाराष्ट्रात डॉक्टरची महिलेला मध्यरात्री विवस्त्र करुन मारहाण…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…