बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…

ठाणे: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापाणे पूलाच्या खाली असेलल्या एका खड्डयात पडून दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. मालाड येथे राहणारी अपघातग्रस्त महिला वसईत बहिणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात अपघात झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान पूजा गुप्ता (वय 27) यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पूजा गुप्ता या पतीसोबत मालाड पश्चिमेच्या आकाशवाणी येथील वृंदावर अपार्मटमेंट मध्ये राहत होत्या. वसईत राहणार्‍या पूजाच्या मामेबहिणाचा बुधवारी (ता. ९) वाढदिवस होता. त्यासाठी पूजा तिचा दिर दिपक गुप्ता (वय 24) याच्या दुचाकावरून वसईच्या वालीव येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. रात्री 9 च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापाणे पूलावरून दुचाकी खाली उतरत असताना मध्येच असलेल्या खड्ड्यात त्यांची दुचाकी जोरात आदळली.

दुचाकी आदळल्यामुळे मागे बसलेल्या पूजा या खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, उपचारादम्यान पूजा यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती नायगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळाराम पालकर यांनी दिली.

धक्कादायक! पोलिस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीचा चाकूने भोसकून केला खून…

हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…

मुंबईमधून शिक्षिका मारिया खान बेपत्ता; काही अघटित तर नाही ना…

प्रेमापायी कर्जबाजारी झालेल्या युवकावर आली नको ती वेळ…

नंदू ननावरे आत्महत्या प्रकरणानंतर भावाने कापले बोट; खासदारही अडचणीत…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!