
पुणे शहरात वाढदिवसाचा केक तलवार व कोयत्याने कापला अन् बड्डे बॉयसह…
पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात वाढदिवसाचा केक धारधार तलवार व कोयत्याने कापून साजरा करणा-या बड्डे बॉय व त्याच्या साथिदारांना घातक हत्यारासह सहकारनगर पोलिस स्टेशन पुणे शहर कडून जेरबंद करण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
सहकारनगर पोलिस कडील तपास पथकाचे अधिकारी व पोलिस अंमलदार असे मकर संक्रातीच्या सणाचे अनुशंगाने १४/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशनचे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत होते. पोलिस अंमलदार महेश मंडलीक यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, के. के. मार्केट सी. एन. जी. पेट्रोल पंपाचे जवळील पाण्याचे वॉटर टँकर पार्कंग जागेत बालाजीनगर धनकवडी पुणे येथे सार्वजनीक ठिकाणी काही जण त्यांचे हातात लोखंडी तलवार व कोयता घेवून केक कापण्यासाठी जमले आहेत. वरिष्ठांच्या परवानगीने सहकारनगर पोलिस कडील तपास पथकाकडील स्टाफने के. के. मार्केट भागात पंचासह जावून छापा घातला असता दोन जण त्यातील एकाचे हातात तलवार व दुसऱ्याचे हातात कोयता घेतलेला व त्यांचे समोरील दुचाकी गाडीचे सिटवर दोन केक ठेवलेले व त्यांचे भोवती काही जण घोळका करून थांबलेले दिसले.
तलवार व कोयता बाळगलेल्यांना तसेच त्यांचे भोवती घोळका करून थांबलेल्यांना जागीच पकडून ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव पत्ता विचारता कोयता बाळगलेल्याने त्याचे नाव
१) आदित्य काशीनाथ साबळे वय १८ वर्षे रा. चोरगे बिल्डींग, तीसरा मजला, शिवाजी पुतळयाजवळ बालाजीनगर धनकवडी पुणे
२) ऋतीक राजु जाधव वय १९ वर्षे रा. आराधना सोसायटी ऐ वींग पहिला मजला फ्लॅट नं.०२, पुन्याईनगर धनकवडी पुणे
३) रोहीत राजु घोरपडे वय २३ वर्षे रा.बुध्द विहाराजवळ चव्हाणनगर धनकवडी पुणे मुळ रा. बोरूड गल्ली काळा मारूती मंदिराजवळ जि. अहमदनगर
४) आदित्य रमेश क्षिरसागर वय १९ वर्षे रा.भारत नगर, खोपडे नगर, डिपीच्या कारखान्याजवळ निंबाळकरवाडी कात्रज पुणे असे असल्याचे सांगितले तसेच तलवार बाळगलेल्या एक अल्पवयन साथिदारस ताब्यात घेतले. त्यांचेकडे चौकशी करता आदित्य साबळे याने माझा व अल्पवयीन साथिदार याचा वाढदिवस असल्याने केक
कापण्यासाठी तलवार व कोयता जवळ बाळगल्याचे सांगितले. त्यांच्याकडून एक लोखंडी कोयता व एक तलवार अशी दोन घातक हत्यारे जप्त करुन त्याचेविरुध्द सहकारनगर पोलिस स्टेशन येथे रजिस्टर गुन्हा नंबर १५/२०२४ आर्म अॅक्ट क ४ (२५) व महा.पो.अधि. क ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आला आहे.
सध्याच्या काळात गुन्हेगार आणि तरुणांमध्ये रात्रीचे वेळी चौका चौका मध्ये गर्दी करुन वाढदिवस साजरा करण्याचे प्रकार चालु झाले आहेत आणि त्यात दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाचे केक तलवार,कोयता सारख्या मोठमोठया बेकायदेशिर हत्याराने कापले जातात त्याचे व्हिडीओ काढुन सोशल मिडीयावर ठेवले जातात त्यावर आळा बसविण्या करिता सदर प्रकारा वर लक्ष ठेवुन सहकारनगर पोलिस स्टेशन पुणे शहर यांच्या कडुन कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कामगीरी अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ-२, स्मार्तना पाटील, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, संदीप देशमाने पोलिस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, सहा. पोउपनिरी बापु खुटवड, पोलिस अंमलदार सुशांत फरांदे, भुजंग इंगळे, महेश मंडलिक, अमोल पवार, निलेश शिवतारे, बजरंग पवार, नवनाथ शिंदे, विशाल वाघ, सागर कुंभार, सागर सुतकर यांनी केली आहे.
पुणे शहरात भरचौकात गाडी आडवी लावून तलवारीने कापला केक अन्…
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…
सहकारनगर पोलिसांनी पीएमटीमध्ये चोरी करणाऱ्यास शिताफीने केली अटक…
सहकारनगर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला केले जेरबंद…
सहकारनगर पोलिसांनी दोन सराईत गुंडांना केले जेरबंद…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

