
सांगलीत भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी…
सांगलीः वांगी (ता. कडेगाव) येथे दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. विकास मोहिते आणि पुष्पा मोहिते (रा. खटाव) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अपघातग्रस्त वाळवा तालुक्यातील ताकारी येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटपून गुरुवारी रात्री उशिरा ते खटावकडे परतत होते. यावेळी महाबळेश्वरहून वांगीकडे परतत असणाऱ्या कारने त्यांना समोरून धडक दिली. दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दाम्पत्य जागीच ठार झाले. अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत.
खटाव येथील विकास भिकू मोहिते हे मोटारीतून ताकारी (ता. वाळवा) येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आले होते. गुरुवारी रात्री उशिरा कार्यक्रम आटोपून ते पत्नी पुष्पा आणि इतर नातेवाईकांसह वांगी कडेपूरमार्गे खटाव येथे परतत होते. याचवेळी जमीर ईलाही आवटी (रा. महाबळेश्वर, जि. सातारा) हा प्रवासी मोटार घेऊन महाबळेश्वरहून कडेपूर-वांगीमार्गे सांगलीच्या दिशेने निघाला होता. वांगी येथील वाल्मिकनगर परिसरात ताकारी योजनेच्या कालव्यावरील पुलाजवळ जमीर आवटीच्या मोटारीने समोरून येणाऱ्या विकास मोहिते यांच्या मोटारीस जोरदार धडक दिली. यावेळी दोन्ही मोटारींच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला झाला. या भीषण अपघातात मोहिते दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या मोटारीतील ऋतुजा रोहित तोरसे, विजया प्रकाश तोरसे, आरोही रोहित तोरसे, आर्या अरुण तोरसे हे गंभीर जखमी झाले आहेत. प्रवासी मोटारीचा चालक जमीर आवटी हा देखील जखमी आहे.
जखमींना कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याबाबत ऋतुजा रोहित तोरसे (रा. खटाव) यांनी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
महाराष्ट्रात भीषण अपघात! वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून 5 कामगारांचा झोपेतच मृत्यू…
पुणे! IT इंजिनियरचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् चिमुकल्याचा चिरला गळा…
हृदयद्रावक! मानसी लोहगडावरील एका कठड्यावर निराश अवस्थेत बसली अन्…
जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक…
पुणे! हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात नवा ट्वीस्ट…

