अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…

मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील घरातच झालेल्या चाकू हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री चोरट्याने घरात घुसून हल्ला केला. यानंतर सैफ आणि त्याच्या घराच्या सुरक्षेबाबत आता बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. याचदरम्यान हल्लेखोराचे सैफच्या घरातील सदस्याशी कनेक्शन समोर आले आहे.

चोरट्याने केलेल्या चाकू हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरचा वार झाला. तसेच सैफ अली खानचा हात आणि पाठीवरही जखम झाली. या हल्ल्यात सैफ अली खानच्या पाठीत शस्त्र रुतलेले होते. रुतलेले शस्त्र काढण्यासाठी लिलावती रुग्णालयात सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लिलावती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या सात टीम तपास करत आहेत. क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सैफ अली खानच्या घराबाहेर पोलीस तपास करत आहे. याचदरम्यान पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सैफ अली खानच्या घरात घरकाम करणाऱ्या एका महिलेचा जबाब नोंदवला जाणार आहे. घराकाम करणाऱ्या एका महिलेच्या भूमिकेबद्दल पोलिसांना संशय आहे. घरकाम करणाऱ्या महिलेच्या वैद्यकीय उपचारानंतर जबाब नोंदवला जाईल. याशिवाय सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांमधील 3 जणांचे जबाब नोंदवले जात आहेत.

महिला कर्मचाऱ्याला भेटण्यास अज्ञात व्यक्ती घरात आल्याचे सांगण्यात येत आहे. सैफ अली खानच्या घरात असणाऱ्या महिला मदतनीसानेच आरोपीला घरात प्रवेश दिला. तसेच या अज्ञात व्यक्तीने सदर महिला मदतनीसावर हल्ला केला. या वादात सैफ अली खान पडल्याने अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला.

अज्ञात व्यक्ती मुख्य दरवाजाच्याशेजारी असलेल्या पहिल्या रुममधून घरात शिरला. या अज्ञात व्यक्तीला सर्वात प्रथम घरात काम करणाऱ्या मोलकरणीने पाहिले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. अज्ञात व्यक्तीने मोलकरणीच्या हातावर चाकूने वार केला. यामुळे मोलकरणीने आरडाओरडा सुरु केला. मोलकरणीच्या मदतीसाठी सैफ अली खान बाहेर धावून आला. यानंतर सैफ अली खान आणि अज्ञात व्यक्तीमध्ये झटापट झाली. या झटापटीत अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानच्या हातावर, पाठीवर, मानेवर प्राणघातक वार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान, पोलीस या हायप्रोफाईल प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. सैफवर हल्ला करणारी व्यक्ती रात्रभर घरात दबा घरून बसली होती, अशी माहिती समोर आली आहे. हल्लेखोर सैफच्या घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या ओळखीतला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. सैफ अली खान याच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घरातील चार लोकांना पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

सैफ अली खान याचे घर वांद्रे येथे आहे. त्याच्या घराबाहेर टाइट सिक्युरिटी असते. इतकी सिक्युरिटी असूनही सैफच्या घरात चोर कसा शिरला याचा शोध सुरू आहे. याचाच तपास करण्यासाठी क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायक हे सैफच्या घरी पोहोचले आहेत. त्याचबरोबर फॉरेन्सिक टीमही सैफच्या घरी पोहोचले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…

अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या चालकाला अपघात प्रकरणी केली अटक…

साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याला कोठडी…

अभिनेत्री नरगिस फाखरी हिच्या बहिणीला अटक; प्रियकराला जिवंत जाळलं…

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरावर, कार्यालयावर ईडीचे छापे…

प्रेम प्रकरण! अभिनेत्रीला पोलिसांनी घेतले ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!