
पुणे शहरात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट झाल्याने पोलिसकाका जखमी…
पुणे : पुणे शहरातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक तीन समोरील एका चहा स्टॉलवर गॅस शेगडीजवळ ठेवलेल्या लायटरचा स्फोट झाल्याने पोलिस कर्मचाऱ्यास गंभीर दुखापत झाली आहे. निलेश सुभाष दरेकर असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक तीन समोरील एका चहा स्टॉलवर गॅस शेगडीजवळ ठेवलेल्या लायटरचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. गॅस शेगडीवर ठेवलेला लायटर गरम होऊन त्याचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना आज (गुरुवार) दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. येथील वडापावच्या गाडीवर दुपारी कर्मचारी जेवायला आले असताना ही घटना घडली. त्यावेळी झालेल्या आगीच्या भडक्यात पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिस कर्मचारी निलेश सुभाष दरेकर हे जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला आणि चेहऱ्याला भाजले आहे. औंधच्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, मात्र हाताला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात पोलिसकाकाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या…
पुणे शहरातील पोलिसकाकाची गोळी झाडून आत्महत्या…
पुणे शहरातील पोलिसकाकाने रेल्वेखाली उडी घेऊन घेतला जगाचा निरोप…
पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…
पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाचा हृदयविकाराने मृत्यू….

