लोणावळा परिसरात सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरूच…

लोणावळा (संदिप कद्रे) : लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरूच असून, नियमांचे पालन न करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बार चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिनांक १०.०१.२०२५ रोजी लोणावळा उपविभागात मध्यरात्री केलेल्या कारवाईत कामशेत येथील १) दीपा बार अँड रेस्टॉरंट व वडगाव मावळ मधील २) फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट अशा दोन ठिकाणी पोलिस पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वरील बार रेस्टॉरंट चालक हे विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी त्यांचे बारमध्ये ग्राहकांना खाद्यपदार्थ, दारू ई.ची विक्री करताना तसेच वाद्य,ऑर्केस्ट्रा चालू ठेवलेला असताना मिळुन आले. यामुळे दोन्ही बार चालकांवर भारतीय न्याय संहिता चे कलम २२३ व महाराष्ट्र पोलिस अधिनियम चे कलम ३३(डब्ल्यू) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कामशेत पोलिस स्टेशन वडगाव मावळ पोलिस स्टेशन हे करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांचे पथकासह केली आहे.

लोणावळा येथे सत्यसाई कार्तीक यांनी संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत मोठी कारवाई…

लोणावळा पोलिसांनी कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा केला जप्त…

लोणावळा येथे सत्यसाई कार्तिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच…

लोणावळा येथे गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांची कारवाई…

आयपीएस सत्यसाई कार्तीक यांचा संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच…

सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत दणकेबाज कारवाई…

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!