दोन कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या माओवाद्यांच्या बड्या नेत्याला अटक…
मुंबई: दोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहिर असलेल्या उच्चशिक्षित जहाल माओवादी नेत्याला तेलंगणामधून पोलिसांनी अटक केली आहे. संजय राव उर्फ दीपक असे या माओवाद्याचे नाव आहे. संजय याची पत्नीही माओवादी असून तिलाही बंगळूरूमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
संजय हा उच्चशिक्षित आहे. त्याने बीटेकपर्यंत शिक्षण घेतले आहे. तो गेल्या तीस वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रिय आहे. माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा तो सदस्य देखील आहे. त्याला तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. त्याची माहिती देणाऱ्याला महाराष्ट्रात पन्नास लाख रुपयांचे तर इतर राज्यात मिळून दोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
दीपक हा महाराष्ट्रातील अंबरनाथ येथील मूळ रहिवासी असून, त्याने कश्मीरमध्ये बीटेकचे शिक्षण घेतल्यानंतर तो महाराष्ट्रात परतला होता. त्यानंतर तो माओवादी चळवळीत सक्रिय झाला. महाराष्ट्रासह काही राज्यात त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे येथे 2015 मध्ये पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तीन जणांना अटक झाली होती. त्यावेळी संजय तिथून निसटला होता. माओवादी चळवळीशी संबंधित काही साहित्य, शस्त्र आणि रोख रक्कम त्या ठिकाणी सापडली होती. संजय याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…
ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची मध्यरात्री हत्या; नदीवर अंघोळ केली अन्…
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत कर्नल, मेजर, पोलीस अधिकारी आणि श्वान हुतात्मा…
जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…