पुण्यातील संशयित दहशवादी प्रकरणात आणखी एक ताब्यात; युवती रडारवर…

पुणे: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) रत्नागिरीतील एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरुन पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन संशयितांना अटक केली होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने आता रत्नागिरीतील एका व्यक्ती चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

दोन दहशतवाद्यांच्या अटकेनंतर तिसरा आरोपी सुद्धा सापडला आहे. आणखी 6 आरोपी सक्रिय असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले आहे. यामध्ये 2 युवतींचाही समावेश आहे. जामिया मिलियाची विद्यार्थिनी असलेली अलिफिया नामक अल सफाची सक्रिय महिला ही एटीएसच्या रडारवर आहे. महाराष्ट्र एटीएसने अलिकडेच (22 जुलै) पुण्यात अटक केलेल्या दोन संशयित दहशतवादी प्रकरणाचा तपास हाती घेतला. तपासादरम्यान दोघांच्या चौकशीतून आणखी काही लोकांची नावं समोर आली आहेत. त्यानंतर एटीएसच्या पथकाने अनेकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पुण्यात स्फोट करण्याचा कट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने एकाला गोंदियातून अटक केली. त्याने पुण्यात याआधी पकडलेल्या 2 दहशतवाद्यांना राहण्यासाठी गोंदियात सोय केली होती. आता या प्रकरणी आणखी सहा जणांचा शोध घेतला जात आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात दोन दहशतवाद्यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आली होती. दोन्ही दहशतवाद्यांनी सातारा आणि कोल्हापूरच्या जंगलात स्फोटकांची चाचणी केल्याची माहिती एटीएसला समजली होती.

मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ या दोन दहशतवाद्यांना मागील सोमवारी मध्यरात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलिस कॉन्स्टेबल्सनी संशयास्पद हालचाली जाणवल्याने पकडले. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम हा यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाला. अटकेतील दोघांना 5 ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली. तत्पूर्वी, या तीनही दहशतवाद्यांनी राजस्थानमधील जयपूर येथे घातपात करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) त्यांचा शोध घेत होती. एनआयएने मोहम्मद शहनवाज आलम याच्यावर पाच लाख रुपयांचे इनाम देखील जाहीर केले आहे. हे दोघे 15 महिन्यांपासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते.

दोन पोलिसांनी मोहम्मद युनुस खान आणि मोहम्मद युसुफ यांना हटकले असता त्यांनी त्यांची खोटी नावे सांगितली. मात्र, पोलिस कॉन्स्टेबल्सनी ट्रु कॉलरच्या सहाय्याने फोन लावून पाहिला असता त्यांची वेगळीच नावे फोनवर दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी ते दोघे राहत असलेल्या कोंढव्यातील घरी जाऊन तपास केला असता इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी ते काम करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे महत्त्वाचे नकाशे आणि इतर साहित्य आढळून आले. हे दोघेही बनावट नावाने गेल्या दीड वर्षापासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते.

पुण्यात स्फोट करण्याचा कट; तिसऱ्या आरोपीला गोंदियातून अटक…

पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसची धक्कादायक माहिती…

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!