मराठा आंदोलनानंतर गृहविभागाचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश…

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज (गुरुवार) आठवा दिवस असून, त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठींबा मिळत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांकडून राजकीय नेत्यांची घरे, कार्यालय आणि आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले. अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांना अलर्ट देण्यात आला आहे.

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात उसळलेल्या हिंसाचाराची दखल घेत सर्व पोलिस ठाण्यांना त्यांच्या हद्दीत सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हेगारी नोंदी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. पोलिस अशा लोकांवर सीआरपीसी कलम 107 अंतर्गत कारवाई करत आहेत. व्हीआयपी सुरक्षा विभाग आणि सर्व आयजी, एसपी यांना त्यांच्या भागात राहणारे आमदार आणि नेत्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या लोकांच्या (पोलिस) संपर्कात राहण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार त्यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवण्यासाठी सूचित केले आहे.

निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!

राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. राज्यात काही ठिकाणी मराठा आरक्षणाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची चर्चा झाली. या बैठकीला विविध पक्षातील 32 नेत्यांची उपस्थिती होती.

बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले की, ‘टिकणारे आरक्षण मिळावे ही सरकारची भावना आहे. मराठी समाजाला आरक्षण मिळावे या भूमिकेवर सर्वांचे एकमत आहे. इतर समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देऊ. मात्र मी जरांगे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी सरकारला वेळ द्यावा. त्यांनी उपोषण मागे घ्यावे. तसेच हिंसाचाऱ्याच्या घटनावर सर्व पक्षांनी नापसंती दर्शवली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार ठोस पावलं उचलणार आहे. आंदोलन शांततामय मार्गाने व्हावे.’

पोलिस ॲक्शन मोडवर; गुन्हे दाखल; जमावबंदीचे आदेश…

नवले पुलावरील जाळपोळप्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल…

महाराष्ट्र बंदबाबत मेसेज व्हायरल; पोलिसांकडून आवाहन…

मराठा आंदोलन! पोलिस आता अलर्ट मोडवर…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!