
रक्षाबंधनला माहेरी जाण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद; नवरा जोरात चावला अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : रक्षाबंधनाच्या दिवशी माहेरी जाण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. नवऱ्याने रागाच्या भरात चावा घेत पत्नीचे नाकच तोडले. बर्फात नाक ठेवून कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
देहात कोतवाली परिसरातील बनियानीपुरवा येथे राहणारी अनिता (वय 27) हिचे बेहता गोकुळ येथे माहेर आहे. रक्षाबंधनाच्या सणासाठी ती पती राहुलकडे आई-वडिलांच्या घरी जाण्याचा आग्रह करत होती. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. राहुलने अनिता हिचे नाक दाताने चावले आणि तोडले. रक्ताबंबाळ झालेल्या अनिताची प्रकृती बिघडली. घरात उपस्थित असलेल्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक नृपेंद्र यांनी सांगितले की, पती-पत्नीमध्ये पूर्वीपासून वाद सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अनिता काही दिवसांपूर्वीच तिच्या माहेरून सासरच्या घरी परतली होती. रविवारी ती पुन्हा तिच्या माहेरच्या घरी जाण्याचा हट्ट करत असल्यामुळे ही घटना घडली. पुढील तपास करत आहोत.
हृदयद्रावक! रक्षाबंधनाला माहेरी आली अन् अंधारात नको ते घडलं…
पोलिस पत्नीचे अनैतिक संबंध अन् पाच जणांचा मृत्यू; सुसाईड नोट मिळाली…
पत्नीने केला नवऱ्याचा हॉटेलपर्यंत पाठलाग अन् दोन युवतींसोबत…
धक्कादायक! मामीसोबत प्रेमसंबध असल्याचे पत्नीला समजले अन्…
वहिनी आणि दिराचे अनैतिक संबंध! नवऱ्याला चहा द्यायची अन्…

