पुणे शहरात मोबाईल चोरी करणाऱ्यांना युनिट 4ने मुद्देमालासह घेतले ताब्यात…

पुणे (संदिप कद्रे): एनटेक्स ट्रान्सर्पोटेशन सर्व्हिस प्रा.लि.कंपनीमधील मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह युनिट 4ने ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा युनिट 4चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

चतुर्श्रुंगी पोलिस ठाणे गु.र. नं. 938/2023 भादवी कलम 381 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल होता. सदर दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना 20/01/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 4 चे पोलिस हवा. सारस साळवी व पोलिस अंमलदार अमोल वाडकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भोसले नगर येथील बँक ऑफ बडोदा समोरील रोडवर स्वप्निल खताळ व त्याचा मित्र येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कमी किंमतीत मोबाईल विकत आहे. खात्रीशीर बातमी मिळाल्याने युनिट 04 कडील पथकाने सदर ठिकाणी जाऊन संशयितांना ताब्यात घेतले.

1) स्वप्निल जिमा खताळ वय 22 वर्षे, राहणार बावधन खुर्द विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ, पुणे
2) इंद्रजीत गजेंद्रसिंग परदेशी, वय 36 वर्षे राहणार जयमाला नगर, लेन नंबर 6, जुनी सांगवी, पुणे, अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचेकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्यांनी एनटेक्स ट्रान्सर्पोटेशन सर्व्हिस प्रा.लि.कंपनीमधून मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांचे ताब्यात 05 मोबाईल एकूण किंमत 1,00,000/- रुपयाचे मिळून आले. दाखल गुन्हा उघडकीस आणून दाखल गुन्ह्यातील आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाई कामी चतु:र्श्रुंगी पोलिस ठाणे पुणे यांचे ताब्यात जप्त मुद्देमालासह देण्यात आले आहे.

सदरची कारवाई रामनाथ पोकळे अपर पोलिस आयुक्त पुणे, अमोल झेंडे पोलिस उप आयुक्त गुन्हे, सतीश गोवेकर सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे -2, गुन्हे शाखा युनिट 4चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांचे मार्गदर्शनाखाली API विकास जाधव, PSI जयदीप पाटील, पोलिस हवा. हरीश मोरे, सारस साळवी, विठ्ठल वाव्हळ, प्रवीण भालचिम, अजय गायकवाड, संजय आढारी, अमोल वाडकर, वैभव रणपिसे, शितल शिंदे यांनी केली आहे.

पुणे शहरात साऊंड सिस्टीम चे साहित्य चोरणाऱ्यांना युनिट 4ने केली अटक…

फ्लिपकार्ट कंपनीमधील मोबाईल चोरी करणारा युनिट 4चे ताब्यात…

पुणे शहरात कार्यालयातील लाखो रुपये चोरणाऱ्याला युनिट ४ने ठोकल्या बेड्या…

Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!