पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): लोणी काळभोर पोलिस स्टेशन हद्दीमधील अभिजीत अभिमन्यू आहेरकर (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०४ साथीदारांविरूध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत केलेली ही ८३ वी कारवाई आहे.

फिर्यादी हे २५/०९/२०२३ रोजी रात्रौ त्यांचे मित्र सलमान पठाण यांच्यासह इंदिरानगर चौक, लोणी-काळभोर (ता. हवेली, जि. पुणे) या ठिकाणी गप्पा मारत उभे होते. त्यांच्या ओळखीचे प्रथमेश आयरे व प्रणव शिरसाठ यांनी मोटार सायकलवरुन येवून, फिर्यादीस कट मारला. त्यावेळी फिर्यादी यांनी दोघांना, निट बघून गाडी चालविता येत नाही का? असे बोलण्याचा प्रथमेश आयरे याला राग येवून, थांब तुला बघतोच असे म्हणून निघून गेले. काही वेळाने दोन मोटार सायकलींवर प्रथमेश आयरे, प्रणव शिरसाट याच्यासोबत अभिजीत आहेरकर, अभिषेक रामुपुरे यांनी येवून अभिजीत आहेरकर याने त्याचे हातात लोखंडी कोयता तसेच अभिषेक रामपुरे याचे हातात लोखंडी रॉड तसेच प्रथमेश आयरे व प्रणव शिरसाठ हे देखील हातात कोयते घेवून फिर्यादी यांचे जवळ आले.

आम्ही लोणी गावचे बाप आहोत, आता तुमची विकेट टाकतो, असे म्हणून प्रथमेश आयरे याने फिर्यादीस जीवे मारण्याचे उद्देशाने त्यांच्या डाव्या कानावर वार करून, प्रणव शिरसाठ याने सलमान पठाण याच्या डाव्या हातावर कोयत्याचा वार केला. त्यामुळे फिर्यादी व त्यांचे मित्र घाबरून जीव वाचविण्याचे उद्देशाने तेथून पळून जात होते. आरोपींनी आराडा-ओरडा करून तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे बोलून, फिर्यादी यांचे पाठीमागे कोयते घेवून पाठीमागे धावले. सदर परिसरात दहशत निर्माण केली म्हणून फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन लोणी काळभोर पोलिस स्टेशनगुन्हा रजि नं. ६०३/२०२३, भा.दं.वि.क.३०७,३२६,५०४,५०६, १४३,१४४,१४७,१४८,१४९, भारतीय हत्यारकायदा कलम ४(२५), सह महाराष्ट्र पोलिस अधि. १९५१ चे कलम ३७ (१) (३), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट३,७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान आरोपी
१) अभिजीत अभिमन्यु आहेरकर, वय २२ वर्षे, रा.लोणी काळभोर,ता.हवेली, जि. पुणे (टोळी प्रमुख)
२) अभिषेक दत्तात्रय रामपुरे, वय २० वर्षे, रा. आल्हाटचाळ,कदमवाक वस्ती, ता. हवेली, जि. पुणे
३) प्रथमेश गणेश आयरे, वय १९ वर्षे, रा. सिद्राममळा, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे यांना अटक करण्यात आली आहे.
१) प्रणव भारत शिरसाठ २ ) गौरव गोपीचंद बडदे हे पाहिजे आरोपी आहेत.

आरोपी १) अभिजीत अभिमन्यु आहेरकर (टोळी प्रमुख) याने व इतर साथीदारांसह स्वतःचे अधिपत्याखाली संघटीत गुन्हेगारी टोळी निर्माण केली आहे. सदर गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व काशिनाथ पाटीलनगर, बालाजीनगर, धनकवडी या परिसरामध्ये प्रस्थपित व्हावे, दहशत निर्माण व्हावी यासाठी त्यांनी आपल्या गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व आर्थिक फायदयासाठी, सदर टोळीच्या मार्फतीने लोणी-काळभोर गाव व आजु-बाजुचे परिसरात अग्निशस्त्राचा व धारदार शस्त्राचा वापर करुन दहशत निर्माण केलेली आहे. अभिजीत अभिमन्यु आहेरकर याच्या विरुध्द् यापुर्वी सन २०१९ पासुन एकुण ०६ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये १) खुनाचाप्रयत्न करणे २)अग्नीशस्त्र बाळगणे ३) प्राणघातक धारदार हत्यारे जवळ बाळगणे ४) गंभीर दुखापत करणे५)जमाव जमवून दहशत पसरविणे ६) गर्दी मारामारी ७) मालमत्तेचे नुकसान करणे अशा विविध प्रकारचे गंभीरस्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हेकेलेले आहेत.

पोलिस आयुक्त, परिमंडळ-०५, पुणे शहर यांनी सदर टोळीस महाराष्ट्र पोलिसअधिनियम कलम ५५ प्रमाणे हद्दपार आदेश क्र.२२/२०२१,दि.२१/०८/२०२१ अन्वये दोन वर्षे करीता तडीपारकेले होते. सदर तडीपार कालावधीमध्ये टोळी प्रमुख व टोळी सदस्यांकडून गुन्हे घडलेले आहेत. तसेच तडीपार कालावधी संपल्यानंतर त्याचे व त्याचे टोळी विरुध्द् लोणी काळभोर पो. स्टे. वरीलप्रमाणे दखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१)(ii)३(२),३(४) चा अंतर्भाव करणेकामी लोणी काळभोर पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पोलिस उप-आयुक्त, परि-५, पुणे शहर, विक्रांत देशमुख यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रदेशिक विभाग, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करुन लोणी काळभोर पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं.६०३/२०२३, भा.दं.वि.क.३०७,३२६,५०४,५०६,१४३,१४४,१४७,१४८,१४९, भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलिसअधि.१९५१ चे कलम ३७(१) (३), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ३,७ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्रसंघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२), ३(४) चा अंतर्भाव करण्याची अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे, रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा, पोलिस उप-आयुक्त,परिमंडळ -०५, विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलिस आयुक्त, हडपसर विभाग, अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर पोलिस स्टेशन पुणे शशिकांत चव्हाण, तात्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलिस निरीक्षक, (गुन्हे), सुभाष काळे, पोलिसउप-निरीक्षक,अमित गोरे, पोलिस उप-निरीक्षक, हनुमंत तरटे, सर्वेलन्स पथकाचे पोलिस अंमलदार, तेजभोसले, संदीप धनवटे,आशितोष गवळी, मल्हारी ढमढेरे, मंगेश नानापुरे, रोहिणी जगताप यांनी केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर देवुन शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशतनिर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटनकरण्याचे उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यातआले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ८३ वी कारवाई आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!