
चिकन खाणाऱ्या 41 पोलिसांना विषबाधा; रुग्णालयात दाखल…
चंद्रपूरः पोलिस प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या 41 पोलिसांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. बहुतांश पोलिसांवर प्रथमोपचार करून सुट्टी देण्यात आली आहे. तर, 3 पोलिस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत.
पोलिस फुटबॉल मैदानावरील पोलिस कॅन्टीनमध्ये रविवारी दुपारी 200 पोलिसांनी जेवण केले होते. त्यातील 41 पोलिसांना जेवणानंतर उलट्या होण्यास सुरवात झाली. त्यामुळे, तात्काळ पोलिसांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुपारी जेवणात खाललेल्या चिकनमधून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. 39 पोलिसांना प्राथमिक उपचार करून सुटी देण्यात आली असून, 3 पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतरही बाधित पोलिस रुग्णालयात दाखल होत असल्याने बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कँटीनमध्ये रविवारी चिकन बनवण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी जेवण केल्यावर लगेच त्यांना उलट्या सुरू झाल्या आणि पाहता पाहता आकडा वाढला. एकच गोंधळ सुरु झाला. उलट्या होणाऱ्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, उन्हामुळे कदाचित चिकन खराब झाले असल्याने हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांचा अंदाज आहे.
ड्राय आईस! हॉटेलमध्ये माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या…
संतापजनक! शाकाहारी जेवन ऑर्डर केलं अन् आढळला मेलेला उंदीर…
महाराष्ट्र पोलिस भरती ऑनलाइन अर्ज 5 मार्चपासून; पाहा सविस्तर माहिती…
महाराष्ट्र गृह विभागाचा पोलिसांना मोठा दिलासा…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

