
विधानसभा निवडणुकीमुळे शाळेला सुट्टी अन् तिघांचा गेला जीव…
ठाणे : भिवंडी येथील वऱ्हाळा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. साहील पीर मोहम्मद शेख (वय 13), गुलाम मुस्तफा मन्नान अन्सारी (वय 14), आणि दिलबर रजा सनसुलहक अन्सारी (वय 11) असे या तीन मृत मुलांची नावे आहेत.
तलावात बुडाल्यानंतर या तिन्ही मुलांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात आली. त्यानंतर या तिन्ही मुलांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले. विधानसभा निवडणूक असल्यामुळे शाळेला सुट्टी होती. यामुळे तिन्ही मुले तिघे घरातून बाहेर पडले होते. मात्र, उशीर झाला तरी ते घरी परतले नाहीत. त्यानंतर घाबरून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. बराच वेळ शोध घेऊनही मुलांचा पत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी शेवटी शांतीनगर पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार नोंदवली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली. अग्निशामक दलानेही तलावात शोध मोहीम चालू केली.
मुलांचा बराच वेळ शोध घेतल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी गुलाम या मृतदेह सापडला. त्यानंतर रात्री साहीलचाही मृतदेह मिळाला. दिलबर या छोट्या मुलाचा मृत्यू रात्रभर सापडला नव्हता. शेवटी शोध घेतल्यानंतर शुक्रवारी (ता. 22) दुपारी दिलबरचा मृतदेह सापडला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हृदयद्रावक! बिबट्या दिसल्याने स्नेहल हिने मारली विहिरीत उडी अन् गेला जीव…
हृदयद्रावक! पती-पत्नीचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार…
हृदयद्रावक! शाळेचे गेट अंगावर पडल्याने विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू…
हृदयद्रावक! मळणीयंत्रात डोक्याचे केस अडकल्याने शिर झाले धडावेगळे…
हृदयद्रावक! दिवाळीच्या दिवशी स्वयंचलित दार झाले लॉक; व्यापाऱ्यासह तिघांचा जळून मृत्यू…
हृदयद्रावक! दहावीत 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या…
हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…
हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…

