
पोलिसकाकाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…
परभणीः पोखर्णी-पाथरी मार्गावर रविवारी (ता. १४) रात्री साडेआठच्या सुमारास चारचाकी आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सोनपेठ येथे कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर मारोतराव गवारे (वय ५६, रा. पाथरी) हे जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की चारचाकी वाहन जळून खाक झाले आहे.
प्रभाकर गवारे हे सोनपेठ पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. रविवारी रात्री ते परभणी येथून सोनपेठकडे दुचाकीने जात होते. दरम्यान, भारसवाडा येथे समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ या चारचाकी क्रमांक (एम एच १२ एम एल ४७५०) वाहनांची समोरासमोर धडक झाली. वाहनाच्या धडकेनंतर गवारे हे बाजूला फेकले गेले. यात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. दरम्यान काही वेळाने दोन्ही वाहनांना आग लागल्याने त्या खाक झाल्या आहेत.
चार चाकी वाहनातील प्रवासी आग लागण्याअगोदरच घटनास्थळावरून पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बी.आर. बंदखडके, बळीराम मुंडे, विठ्ठल कुकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.
पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे हे २०१९ साली सोनपेठ पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर रुजू झाले होते. काही महिन्यापूर्वी त्यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली होती. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई पोलिसकाकाचा चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून खून…
पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाचा हृदयविकाराने मृत्यू….
हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…
पोलिसकाकाचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू; ‘बोला प्रभू’ आवाज हरपला…
पोलिसकाकाने मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणानंतर केली आत्महत्या…
पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…
पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

